दिलासादायक.- उपचाराधीन. – कोरोणा रुग्णांची संख्या. १.१४ लाखांनी घटली.
नवीदिल्ली. वृतसंस्था. २९
कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव दिवसागणिक कमी होत आहे. मागील काही दिवसांपासून नव्या रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, शुक्रावारी उपचाराधीन रुग्णांची संख्या एक लाख 14 हजारांनी कमी झाली आहे. दररोज घटणाऱ्या रुग्णसंख्येमुळे देशातील उपाचराधीन रुग्णांची संख्या 22 लाख 28 हजार 724 इतकी झाली आहे. आठवडाभरापासून दररोज एक लाखांपेक्षा जास्त उपचाराधीन रुग्ण कमी होत आहे. शुक्रावारी देशात 2 लाख 84 हजार 601 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. (1.75 lakh cases of corona were reported in the last 24 hours, the lowest figure in 46 days)
केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, शुक्रावारी देशात नवीन कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 1.73 लाख इतकी आहे. 46 दिवसातील सर्वात कमी रुग्णवाढ आहे.
कोविडविषयी सर्व लेटेस्ट अपडेट येथे वाचा.-
गुरुवारी 1.86 लाख रुग्ण वाढले होते. रुग्णसंख्या घटत असली तरिही मृताची संख्या दिवसागणिक वाढतच आहे. मागील 32 दिवसांपासून दररोज तीन हजारांपेक्षा जास्त कोरोना रुग्णांचा मृत्यू होत आहे.शुक्रावारी 2 लाख 84 हजार 601 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. देशात आतापर्यंत 2 कोटी 51लाख 78 हजार 011 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.
