Homeकोंकण - ठाणे१ जून पासून अनलॉकला तीन टप्प्यांत सुरुवात : मुख्यमंत्री. उद्धव ठाकरे

१ जून पासून अनलॉकला तीन टप्प्यांत सुरुवात : मुख्यमंत्री. उद्धव ठाकरे

१ जून पासून अनलॉकला तीन टप्प्यांत सुरुवात : मुख्यमंत्री. उद्धव ठाकरे

मुंबई प्रतिनिधी:

येत्या १ जून पासून अनलॉक प्रक्रियेला सुरुवात होणार आहे.हा अनलॉक तीन टप्प्यांत केला जाणार असल्याचे आज मुख्यमंत्री यांनी सांगितले.
प्रामुख्याने अनलॉक हा ३ जून ,५ जून व ८ जून अश्या तीन टप्प्यांत केला जाणार आहे.
केंद्र सरकार सह राज्य सरकार चे माहितीनुसार अनलॉक चे प्रक्रियेत बऱ्याच उद्योग धंद्यासाठी शिथिलता देणेत आली आहे.
एकूण तीन टप्प्यांत हा अनलॉक असणार आहे. या तीन टप्प्यांत मिळणाऱ्या अनलॉक प्रक्रिये बद्दल कोण कोणत्या सूचना देण्यात आल्या आहेत हे आपण जाणून घेऊयात.
कंटेंट मेंट झोन वगळता अनेक निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत.

अर्थात काय सुरू आणि काय बंद?

  • पहिला टप्पा :३ जून *

१) सायकलिंग , जॉगिंग, वॉकिंग आणि रनींग यासाठी सार्वजनिक ठिकाणी परवानगी देण्यात येणार आहे.
२) समुद्र किनारे,सोसायटी,बागेत व्यायाम करता येणार आहे.
३) वैयक्तिक कार्यक्रमासाठी परवानगी असेल परंतु सामाजिक कार्यक्रमांना बंदी असेल .सकाळी ५ ते सायंकाळी ७ वाजे पर्यंत परवानगी देण्यात आली आहे.
४) फक्त जवळच्या मैदानात व्यायाम करायचा परवानगी देण्यात आली आहे आणि सायकलिंग चा जास्तीत जास्त वापर करण्याचा सल्ला देणेत आला आहे.
५) प्लंबर ,वीज तार तंत्री आणि पेस्ट कंट्रोल कामगारांना नियमानुसार परवानगी देण्यात आली आहे.
६)परवानगी घेऊन गॅरेज मध्ये गाड्यांची कामे सुरू करता येणार.

दुसरा टप्पा : ५ जून *
१) मोठ मोठे मॉल्स,शॉपिंग सेंटर ,शॉपिंग कॉम्प्लेक्स,वगळता अन्य सर्व दुकाने चालू राहणार .
२) कपड्यांच्या दुकानात असणाऱ्या ट्रायल रूम वर बंदी असेल.
३) कपड्यांच्या दुकानातून एकदा खरेदी केलेली कपडे बदलून मिळणार नाहीत / परत ही दिली जाणार नाही.
४) शॉपिंग साठी वाहने वापरण्यावर बंदी असेल जास्तीत जास्त सायकल चा वापर करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
५) दुकानांना होम डिलिव्हरी टोकण पद्धतीने मार्किंग सह आणि मास्कचा वापर योग्य प्रकारे करायचा आहे.
६) सोशल डीस्टन्स नियम धाब्यावर बसवल्यास दुकाने बंद करण्यात आहे.
७) अत्यावश्यक सेवेसाठी रिक्षा – टॅक्सी कॅम्प फोर व्हीलर आणि टू व्हीलर ही चालेल.

३ रा टप्पा :८ जून
१) १०%कर्मचाऱ्यांच्या उपस्थित खाजगी कार्यालये सुरू राहतील.
२) घरी आणि ऑफिस मध्ये पोहचल्यानंतर स्यानिटायझर करणे बंधनकारक आहे.
३) स्टेडियम मध्ये कोणत्याही प्रकारचे कार्यक्रमांना परवानगी नाही.
४) टू व्हीलर वर एक व्यक्ती थ्री व्हीलर वर तीन व्यक्ती आणि फोर व्हीलर तीन व्यक्ती अशा प्रकारे खाजगी वाहनांना परवानगी देण्यात येणार आहे.
५) ५०% क्षमते सह जिल्हा अंतर्गत बस व वाहतूक सेवा सुरू राहील . आंतर जिल्हा वाहतुकीला परवानगी नाकारण्यात आली आहे.
६) सकाळी ९ ते ५ या वेळेत सोशल डीसटन्स चे नियमांचे पालन करून सर्व दुकाने चालू राहतील . अश्या प्रकारे येत्या १ जूनपासून अनलॉक प्रक्रियेला सुरुवात होईल.हा अनलॉक ३ जून ,५ जून आणि ८ जून अश्या तीन टप्प्या मध्ये करता येणार आहे. लवकरच नव्या जीवनाचा श्रीगणेशा करणेत येणार आहे असल्याचे आज मुख्यमंत्री मा. श्री.उध्दव ठाकरे यांनी सांगितले .तसेच लॉक डाऊन करणे हा एक भाग असून लॉक डाऊन उघडणे हा दुसरा भाग आहे.१ जून पासून या प्रक्रियेला सुरुवात होत असल्याचे त्यांनी सांगितले .

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.