कोरोना उपचारादरम्यान मोठ्या प्रमाणात रुग्णांवर स्टिरॉइड तसेच रेमडेसिव्हिरचा वापर करण्यात आला. यामुळेच इतर आजारांनी डोकं वर काढलं आहे.म्युकरमायकोसिस हे इंजेक्शन. मिळणार १२०० रुपयात.- केंद्रीय मंत्री
नितिन गडकरी.
नागपूर : प्रतिनिधी.
राज्यात सध्या म्युकरमायकोसिसच्या (mucormycosis) आजाराने थैमान घातले आहे. आतापर्यंत भारतातील एकच कंपनी म्युकरमायकोसिससाठी लागणारे अॅम्फोटेरेसीन बी (amphotericin b injection) हे इंजेक्शन तयार करत होती. मात्र, आता वर्ध्यातील जेनेटेक लाइफ सायन्सेस या कंपनीमध्ये हे इंजेक्शन तयार करण्यात आले आहे. येत्या सोमवारपासून या इंजेक्शनचे वितरण सुरू केले जाणार असून अवघ्या १२०० रुपयांत हे इंजेक्शन मिळणार आहे. याबाबत स्वतः केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (union minister nitin gadkari) यांनी ट्विट करून माहिती दिली आहे.कोरोना उपचारादरम्यान मोठ्या प्रमाणात रुग्णांवर स्टिरॉइड तसेच रेमडेसिव्हिरचा वापर करण्यात आला. यामुळेच इतर आजारांनी डोकं वर काढलं आहे. कोरोनावरील उपचारादरम्यान ऑक्सिजनची तूट भरून काढण्यासाठी कोरोना रुग्णांना उद्योगांसाठी वापरला जाणारा ऑक्सिजन देण्यात आला. यामुळे बुरशीचा संसर्ग वाढल्याचे म्हटले जात आहे. तसेच व्हेंटिलेटरमध्ये डिस्टिल वॉटरचा वापर करण्यात आला नाही, यामुळे अनेकदा व्हेंटिलेटरमधील काही कणांमुळे हा आजार बळावला असल्याचे तज्ज्ञ सांगतात, तर काहींना स्टिरॉईडच्या अमर्याद वापरानेही म्युकरमायकोसिसच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे.
Also Read: नागपूर विभागात म्युकर मायकोसिसचे १०६४ रुग्ण, आतापर्यंत ६३ जणांचा मृत्यू
विशेष दातांशी संबधित, जबड्याशी संबधित, नेत्र तसेच कान नाक घसा या विकाराशी संबधित रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात आढळून आले आहेत. बुरशीचा संसर्ग झाल्यावर चेहरा सुजणे, डोकेदुखी, नाक बंद होणे, उलटी येणे, ताप येणे, छातीत दुखणे, साइनस कंजेशन, नाकाच्या आत आणि तोडांमध्ये काळे डाग येणे इत्यादी लक्षणे आढळून येतात. आधीपासून कॅन्सर, मधूमेहसारखे आजार आहेत किंवा जे अनेक दिवसांपासून स्टेरॉइडचे सेवन करतात, त्यांची रोगप्रतिकारशक्ती कमी होते. त्यामुळे अशा रुग्णांमध्ये बुरशीचे आजार होण्याची अधिक शक्यता असते.
Also Read: नागपूर शहरात केवळ २१३ बाधित; बरे होण्याचे प्रमाण ९५.५१ टक्क्यांवर
या आजारासाठी वापरण्यात येणारे इंजेक्शनचा तुटवडा होता. तसेच हे इंजेक्शन जवळपास ७ हजार रुपयांमध्ये विकले जात होते. त्यानंतर रेमडेसिव्हीर तयार करणाऱ्या कंपनीला हे इंजेक्शन तयार करण्याची परवानगी गडकरी यांनी मिळवून दिली. आता हे इंजेक्शन तयार झाले असून समोवारपासून वितरीत केले जाणार आहे.
राज्यात म्युकरमायकोसिसचे ४ हजार ५० रुग्ण –
नव्यानेच म्युकरमायकोसीस नावाचा बुरशीजन्य आजाराचे थैमान महाराष्ट्रात सुरू झाले आहे. अवघ्या महिनाभरात राज्यात ४ हजार ५० बुरशीजन्य आजाराचे रुग्ण आढळून आले असून २८८ जणांना काळ्या बुरशीमुळे जीव गमावला लागल्याची माहिती पुढे आली आहे.
