HomeUncategorizedमी सरकारला शेवटचं सांगतो…”- मनोज जरांगे पाटील यांचा निर्वाणीचा इशारा.( कुणाचा जीव...

मी सरकारला शेवटचं सांगतो…”- मनोज जरांगे पाटील यांचा निर्वाणीचा इशारा.( कुणाचा जीव गेला तर ती संपूर्ण जबाबदारी सरकारची असेल )माणगाव खोऱ्यात सर्वोदय पतसंस्थेच्या निवडणूकीत विद्यमान चेअरमन प्रकाश मोर्ये पॅनलला.- दादा बेळणेकर पॅनलचा जोरदार धक्का

🟥“मी सरकारला शेवटचं सांगतो…”- मनोज जरांगे पाटील यांचा निर्वाणीचा इशारा.
( कुणाचा जीव गेला तर ती संपूर्ण जबाबदारी सरकारची असेल )माणगाव खोऱ्यात सर्वोदय पतसंस्थेच्या निवडणूकीत विद्यमान चेअरमन प्रकाश मोर्ये पॅनलला.- दादा बेळणेकर पॅनलचा जोरदार धक्का

मुंबई.- प्रतिनिधी.

💥मराठा बांधवांना माझी विनंती आहे की आरक्षणासाठी कुणीही आत्महत्या करु नये. माझी सरकारलाही विनंती आहे. की आरक्षणाचा प्रश्न गांभीर्याने घ्या. राज्य सरकारला शेवटचं सांगतो की त्यांनी मराठा समाजाला तातडीने आरक्षण द्यावं. कुणीही उग्र आंदोलन करु नका अशी विनंती मी मराठा बांधवांना करतो आहे. असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. आंतरवली सराटी गावात मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले आहेत. त्यातूनच हे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केलं आहे.

२९ ऑक्टोबरपासून दुसऱ्या टप्प्यातलं आंदोलन

२९ ऑक्टोबरपासून साखळी उपोषण सुरु केलं जाणार आहेच. पण ज्यांना शक्य आहे त्यांनी हे उपोषण नक्की करा. वयोवृद्ध माणसांचा विचार करा. माझी तरुणांना आणखी एक विनंती आहे. की २९ तारखेपासून प्रत्येक गावात तरुण आंदोलकांनी बेमुदत उपोषण सुरु करा. तसं झालं तर सरकारला आपल्या प्रश्नाची दखल घ्यावीच लागेल. तसंच आपल्या गावात कुठल्याही राजकीय पक्षाच्या नेत्याला येऊ द्यायचं नाही. आणि कुणाच्या दारात आपणही जायचं नाही. आधी मराठा आरक्षण मिळालं पाहिजे त्यानंतर नेत्यांना येऊ द्या असंही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. दुसऱ्या टप्प्यातलं आंदोलन २९ तारखेपासून सुरु होईल. या आंदोलनात कुणाला काही झालं तर त्याची संपूर्ण जबाबदारी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि सरकारची असणार आहे असंही मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केलं. आमरण उपोषणाठी २९ पासून अनेक लोक बसणार आहेत. यात कुणाचा जीव गेला तर ती संपूर्ण जबाबदारी सरकारची असेल. सगळ्यांनी शांततेत उपोषण सुरु करावं अशी मी विनंती करतो आहे असंही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.

🟥३१ ऑक्टोबरपासून आंदोलनाचा तिसरा टप्पा सुरु होईल

तिसऱ्या टप्प्यातलं आंदोलन ३१ ऑक्टोबरपासून सुरु होईल. आरक्षण मिळणार आहे मात्र कुणी आत्महत्या करु नका असंही आवाहन मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत. माझ्या पोटात चार दिवसांपासून पाणीही नाही. मला त्रास होतो आहे. मात्र त्यापेक्षा मराठा समाजाला होणारा त्रास खूप मोठा आहे. माझ्या त्रासापेक्षा माझ्या समाजाचा, पोरांचा त्रास जास्त होतो आहे. माझ्या समाजाला आरक्षण कसं मिळेल यासाठी मी उपोषणाला बसलो आहे असंही जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.
मराठा समाजासाठी पुन्हा आंदोलन सुरु झाल्यापासून महाराष्ट्र सरकारतर्फे मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री यांनी कुणीही आपल्याशी संपर्क केलेला नाही. त्यांना कदाचित मराठा आरक्षणाचा प्रश्न गंभीर वाटत नसावा. त्यांना आम्ही शांततेच्या मार्गाने आंदोलन करुन उत्तर देऊ असंही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.

माणगाव खोऱ्यात सर्वोदय पतसंस्थेच्या निवडणूकीत विद्यमान चेअरमन प्रकाश मोर्ये पॅनलला.- दादा बेळणेकर पॅनलचा जोरदार धक्का

तर बाराच्या बारा जागांवर दादा बेळणेकर पॅनलने विजय मिळवत ५ वर्ष अध्यक्ष असलेल्या प्रकाश मोर्ये यांनाही पराभवाची धूळ चारली आहे.- दरम्यान आजच्या निकालात प्रकाश मोर्ये यांना सहकार क्षेत्रात माणगाव खोऱ्यात एक मोठा धक्का मानला जात आहे

कुडाळ:- प्रतिनिधी.

सर्वोदय पतसंस्थेचे विद्यमान चेअरमन प्रकाश मोर्ये पॅनलला दादा बेळणेकरच्या पॅनलला जोरदार धक्का दिला आहे. बाराच्या बारा जागावर विजय मिळवत जोरदार मुसंडी मारली आहे या विजयाने प्रकाश मोर्ये यांचे सहकारातील अस्तित्वाला माणगाव खोऱ्यातून जोरदार धक्का बसल्याचे चित्र आजच्या निकालाने पाहायला मिळाले आहे.

🛑आजच्या निकालात प्रकाश मोर्ये यांना सहकार क्षेत्रात माणगाव खोऱ्यात एक मोठा धक्का मानला जातो. भाजपच्या दुसऱ्या गटांने प्रकाश मोर्ये गटावर मात करत धक्का दिल्याने पुन्हा एकदा भाजप मधील ह्या धक्क्यातून प्रकाश मोर्ये कसे सावरतात हे पाहणे औत्सुक्याच ठरणार आहे. बाराच्या बारा जागांवर दादा बेळणेकर पॅनलने विजय मिळवत ५ वर्ष अध्यक्ष असलेल्या प्रकाश मोर्ये यांनाही पराभवाची धूळ चारली आहे.या निकालाकडे संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याचे लक्ष लागून राहिला होता.दादा बेळणेकर पॅनल कडून प्रकाश मोर्ये पॅनल कडून लढणाऱ्या माजी पंचायत समिती सदस्य मथुरा राऊळ यांचाही धक्कादाय पराभव झाला आहे.

🛑निकाल खालील प्रमाणे:-

दादा बेळणेकर पॅनलचे विजयी उमेदवार –

1) दादा बेळणेकर – 589,
2) सगुण धुरी – 564,
3) सुभाष भिसे – 546,
4) समिर दळवी – 553,
5) प्रकाश म्हाडगुत – 524,
6) दिलीप माळकर – 551,
7) महादेव गावडे – 547,
8) विनोद जाधव – 561,
9) मंजुषा मधुकर परब(महिला) – 610,
10) वैशाली रावजी प्रभू (महिला) – 538,
11) मदन कृष्णा गोसावी(एनटी) – 622,
12) जनार्दन मुकुंद कदम(ओबीसी) – 577,

🔴प्रकाश मोर्ये पॅनलचे पराभूत उमेदवार.

1) प्रकाश मोर्ये – 509,
2) जोसेफ डॉन्टस – 458
3) मुकुंद धुरी – 408,
4) महादेव परब – 427,
5) पंढरीनाथ परब – 458
6) संदेश राणे – 475,
7) उत्तम सराफदार – 438,
8) प्रफुल्ल सुद्रिक – 385,
9) कविता कुडतरकर(महिला) – 472,
10) मथुरा राऊळ(महिला) – 477,
11) रामचंद्र धोंडी खरात(एनटी) – 483,
12) गुरुप्रसाद कोरगावकर (ओबीसी) – 535 हे उमेदवार पराभूत झाले आहे.

बाद – 114.

या निकालानंतर दादा बेळणेकर पॅनलच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष करत फटाकेची आतिषवाजी केली.मतदारांनी टाकलेला विश्वास सार्थकी लावू आणि पतसंस्थेच्या हितासाठी काम करू असे दादा बेळणेकर यावेळी म्हणाले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.