सकल मराठा समाज आजरा तालूका वतीने शनिवार दि.२८ पासून
साखळी उपोषण ..- आजरा तालुक्यातील बांधवांनी उपोषणाला शांततेत पाठिंबा देण्यासाठी यावे
सकल मराठा समाज आजरा तालूका वतीने सोमवार दि.३० पासून
साखळी उपोषण ..- आजरा तालुक्यातील बांधवांनी उपोषणाला शांततेत पाठिंबा देण्यासाठी यावे
आजरा.- प्रतिनिधी.
मराठा आरक्षणासाठी आंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील याचे दि. २५/१०/२०२३ पासून आमरण उपोषण चालू आहे. त्यांचे आमरण उपोषणाल आजरा तालुका सकल मराठा समाजवासीयांकडून पाठिंबा देण्यासाठी दि.३०/१०/२०२३ पासून साखळी उपोषण आजरा तहसिल कार्यालयासमोर सकाळी १ ते ५ या बेळेत करणार आहोत. याबाबतचे निवेदन आजरा तहसीलदार यांना देण्यात आले आहे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. सदरच्या साखळी उपोषणामचे तालुक्यातील वेगवेगळ्या गावांनी शांततेने येऊन साखळी उपोषण करणेचे मान्य केले आहे. तेव्हा आमच्या मराठा बांधवाची आपणास कळकळीची विनंती की, मराठ्यांना सरसकट कुणबी दाखले देऊन ५० १% चे आत्तील आरक्षण देणेसाठी आपण शासनास कळवावे असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. व ग्रामीण भागातील येणाऱ्या सकल मराठा समाजाच्या नागरिकांनी शांततेत येऊन उपोषणाला पाठिंबा द्यावा असे असे आवाहन सकल मराठा समाजाच्या वतीने मारुती मोरे यांनी केले आहे या निवेदनावर
संभाजीराव इंजल कार्याध्यक्ष, चंद्रकांत देसाई उपसमन्वयक
बडोपंत चव्हाण तालूका समन्वयक, मारुती मोरे जिल्हा समन्वयक
चंद्रकांत सरदेसाई कार्यकारणी सदस्य सुर्यकॉन आजगेकर कार्यकारणी सदस्य सह सकल मराठा समाज बांधवांच्या सह्या आहेत.
