मा. उप. सभापती दिपक देसाई यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा
आजरा.- प्रतिनिधी.

मडिलगे ता. आजरा येथील राष्ट्रवादी क्राँग्रेस पक्षाचे व ना. हसन मुश्रीफ यांचे हाडांचे कार्यकर्ते माजी सरपंच व उप. सभापती पंचायत समिती आजरा चे मा. दिपक आनंदराव देसाई यांचा ४५ वा. वाढदिवस विविध उपक्रमांने संपन्न झाला.
या उपक्रमात अंगणवाडी परिसर स्वच्छता, तसेच अंगणवाडी बाल विद्यार्थी यांना खाऊ व लंच बाँक्स वाटप सरपंच बापू निऊगरे यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
सरपंच श्री निऊगरे, मनोगत व्यक्त केले.
यावेळी उप. सरपंच सुशांत गुरव, ग्रामपंचायत सदस्य शामल कातकर, शांताबाई सुतार,अभिजित मोहिते, सह वैभव सुतार, प्रकाश दोरुगडे, अर्जुन देसाई, शेखर देवळे, सचिन कातकर, वैभव कुंभार, सुरज कातकर, संजय मोहिते सह ग्रामस्थ यांनी सहभाग नोंदवला व श्री देसाई यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या

