HomeUncategorizedभूमी अभिलेख कार्यालय आजरा.नियमतानदार निवास वसंत पाटील - सहा हजार रुपयाची लाच...

भूमी अभिलेख कार्यालय आजरा.नियमतानदार निवास वसंत पाटील – सहा हजार रुपयाची लाच घेताना लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात..🛑 आजरा भूमी अभिलेख कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या निषेध .- मालमत्तेची चौकशी व्हावी अन्यथा आंदोलन.🛑आमदार अपात्रता प्रकरणाची आजची सुनावणी संपली.- शिंदे गटाला 25 ऑक्टोबरपर्यंतची मुदत.

🛑भूमी अभिलेख कार्यालय आजरा.
नियमतानदार निवास वसंत पाटील – सहा हजार रुपयाची लाच घेताना लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात..🛑 आजरा भूमी अभिलेख कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या निषेध .- मालमत्तेची चौकशी व्हावी अन्यथा आंदोलन.
🛑आमदार अपात्रता प्रकरणाची आजची सुनावणी संपली.- शिंदे गटाला 25 ऑक्टोबरपर्यंतची मुदत.

आजरा – प्रतिनिधी.

आजरा येथील भूमी अभिलेख कार्यालयातील नियमतानदार निवास वसंत पाटील हे सहा हजार रुपयाची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडले असल्याची खात्रीलायक बातमी आहे. याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी तक्रारदार अक्षय भाऊ जाधव यांच्या चिमणे येथील जमिनीच्या मालमत्ता पत्रकावर नावे चढवण्यासाठी त्यांनी पैशाची मागणी केली होती. यापैकी कांहीं पैसे पाटील यांना यापूर्वी पोहोच करण्यात आले होते. उर्वरित सहा हजार रुपये देण्याकरता पाटील यांनी तगादा लावल्यानंतर जाधव यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधून तक्रार नोंदवली होती. या पार्श्वभूमीवर सदर कारवाई झाल्याचे समजते.
पाटील यांच्यावर रीतसर गुन्हा नोंद करण्यात आला.

🫥 आजरा भूमी अभिलेख कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या निषेध .- मालमत्तेची चौकशी व्हावी अन्यथा आंदोलन.

आजरा.- प्रतिनिधी.

भूमी अभिलेख कर्मचाऱ्यांमध्ये भ्रष्ट कारभार करणाऱ्या कर्मचाऱ्यांची खातेनिहाय चौकशी करून त्यांच्या मालमत्तेची चौकशी करावी. लाचलुचपतच्या जाळ्यात पाटील नावाचे कर्मचारी लाच घेताना सापडले आहेत. त्या कर्मचाऱ्याचा निषेध. असे दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. मागील दोन वर्षांपूर्वी मी कॉम्रेड शिवाजी गुरव भ्रष्ट कारभार संदर्भात याच कार्यालयाच्या दारात आंदोलन केले होते मात्र वरिष्ठांनी त्याची पाठराखण केली.
सदर कार्यालयामध्ये पैसे देणाऱ्यांची कामे होतात गरिबाला न्याय मिळत नाही अशी जनमानसात चर्चा होतीच मात्र सापडल्याशिवाय लबाड म्हणता येत नाही. आता सदर कर्मचाऱ्यांसह कार्यालयातील मोजणी संबंधित सर्व कर्मचाऱ्यांची मालमत्तेची चौकशी करावी. गरिबाला मोजणीला पैसे भरून सुद्धा लवकर मोजणी येत नाही, कर्मचारी कमी असल्याचे सांगून गरीब लोकांना त्रास दिला जातो, त्यांच्यावर अरेरावी केली जाते याचा अनुभव सामाजिक कार्यकर्ते शिवाजी गुरव यांना आला आहे. सदर कर्मचाऱ्यांची मालमत्तेची चौकशी न झाल्यास कार्यालयाच्या दारात आंदोलन केले जाईल, गरिबाला न्याय मिळाण्यासाठी भ्रष्टाचार मुक्त शासकीय कार्यालये झालीच पाहिजे. असे दिलेल्या प्रसिद्धी पत्रकार काँम्रेड.शिवाजी गुरव. यांनी म्हटले आहे.

आमदार अपात्रता प्रकरणाची आजची सुनावणी संपली.- शिंदे गटाला 25 ऑक्टोबरपर्यंतची मुदत.

मुंबई.- प्रतिनिधी.

आमदार अपात्रता प्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर शुक्रवारी प्रत्यक्ष सुनावणी पार पडली. या सुनावणीत विविध याचिकांची वर्गवारी करण्यात आली असून आता 34 वेगवेगळ्या याचिका 6 याचिकांच्या वर्गवारीत मांडल्या जाणार आहेत. तसंच, या पुढील सुनावणी 26 ऑक्टोबर रोजी होणार असून शिंदे गटाला आपली कागदपत्रं सादर करण्यास 25 ऑक्टोबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे.
विधानसभा राहुल नार्वेकरांसमोर पार पडलेल्या सुनावणीमध्ये 34 विविध याचिकांचे सहा गट तयार करण्यात आले आहेत. यामध्ये 1 ते 16 क्रमांकावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या याचिका आहेत. याची वर्गवारी ‘पहिल्या बैठकीत हजर राहिले नाही’, ‘दुसऱ्या बैठकीत उपस्थित नव्हते’, ‘स्पीकर विरोधात मतदान करणे’, ‘बहुमत चाचणी मतदान व्हीप विरोधात भरत गोगावले यांचा व्हीप’, ‘अपक्ष आमदार गट याचिका’ असे सहा गट करण्यात आले आहेत.
या 34 याचिकांची एकंदरीत ढोबळ वर्गवारी केली आहे, अशी माहिती वकिलांनी यावेळी दिली. यातील 17 क्रमांकांची याचिका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून अपक्ष आमदारांविरोधात दाखल केल्या आहेत. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे वकील सनी जैन आपल्या अर्जाविषयी माहिती देताना म्हणाले की, आम्ही कुठल्याही प्रकारे वेळ वाढवून घेत नसून फक्त अर्ज दाखल केला आहे. आम्हाला कागदपत्रं रेकॉर्डवर आणायची आहेत. त्यात आमच्या पक्षाकडून 2 जुलै रोजी व्हीप समोरच्या आमदारांना देण्यात आला होता, याची माहिती आहे. वेळापत्रक संदर्भात आम्ही आक्षेप घेतला आहे आणि त्यावर निर्देश सर्वोच्च न्यायालय देईल, असं जैन यावेळी म्हणाले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.