देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत सलग चार दिवस घट.- झाल्यानंतर किंचितशी वाढ- पहा तर कोरोणाची देशातील परिस्थिती काय आहे.
नवी दिल्ली : वृतसंस्था.२६.
देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत (Corona Cases in India) सलग चार दिवस घट झाल्यानंतर किंचितशी वाढ झाली आहे. आदल्या दिवसाच्या तुलनेत कोरोना बाधितांच्या संख्येत तब्बल 12 हजारांनी वाढ झाली आहे. कालच्या दिवसात 2 लाख 8 हजार 921 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. मोठ्या कालावधीनंतर एका दिवसातील रुग्णसंख्या दोन लाखांच्या खाली गेली होती, परंतु पुन्हा एकदा हा आकडा वाढला आहे. कालच्या दिवसात 4 हजार 157 कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले आहेत. नवे कोरोनाग्रस्त रुग्ण वाढले, त्याचप्रमाणे कोरोनाबळींच्या संख्येतही वाढ झाल्याने काहीशी चिंता व्यक्त होत आहे.
दुसरीकडे लसीकरण झालेल्या नागरिकांच्या संख्येने वीस कोटींचा आकडा ओलांडला आहे (New 208921 Corona Cases in India in the last 24 hours)
24 तासातील आकडेवारी
गेल्या 24 तासात भारतात 2 लाख 8 हजार 921 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 4 हजार 157 रुग्णांना प्राण गमवावे लागले. कालच्या दिवसात देशात 2 लाख 95 हजार 955 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले.
आतापर्यंतची आकडेवारी
भारतातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा 2 कोटी 71 लाख 57 हजार 795 वर गेला आहे. देशात 2 कोटी 43 लाख 50 हजार 816 रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत 3 लाख 11 हजार 388 रुग्णांनी कोरोनामुळे प्राण गमावले आहेत. तर 24 लाख 95 हजार 591 इतके सध्याच्या घडीला सक्रिय रुग्ण आहेत.
आतापर्यंत कोरोना लसीकरण झालेल्या देशातील नागरिकांची संख्या 20 कोटी 6 लाख 62 हजार 456 इतकी असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
देशातील कोरोना रुग्ण आकडेवारी
देशात 24 तासात नवे रुग्ण – 2,08,921
देशात 24 तासात डिस्चार्ज – 2,95,955
देशात 24 तासात मृत्यू – 4,157
एकूण रूग्ण – 2,71,57,795
एकूण डिस्चार्ज – 2,43,50,816
एकूण मृत्यू – 3,11,388
एकूण अॅक्टिव्ह रुग्ण – 24,95,591
आतापर्यंत लसीकरण झालेली संख्या – 20,06,62,456 (Corona Cases in India)

