HomeUncategorizedव्यंकटराव प्रशालेत 'वाचन प्रेरणा दिन' व 'हात धुवा दिन'उत्साहात साजरा. 🛑आजरा तालुका...

व्यंकटराव प्रशालेत ‘वाचन प्रेरणा दिन’ व ‘हात धुवा दिन’उत्साहात साजरा. 🛑आजरा तालुका गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगापासून मुक्त करण्याचे अभियान.

व्यंकटराव प्रशालेत ‘वाचन प्रेरणा दिन’ व ‘हात धुवा दिन’उत्साहात साजरा. 🛑आजरा तालुका गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगापासून मुक्त करण्याचे अभियान.

आजरा:- प्रतिनिधी

आजरा येथील व्यंकटराव हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज आजरा येथे वाचन प्रेरणा दिन व जागतिक हात धुवा दिन साजरा करणयात आला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे प्रशालेचे प्राचार्य आर.जी.कुंभार यांच्या शुभहस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले.याप्रसंगी पर्यवेक्षिका सौ. व्ही.जे.शेलार,ज्येष्ठ शिक्षिका एन.ए. मोरे सौ. एस.डी. इलगे एम.एम.देसाई पी.एस.गुरव .टी. एम.गुरव, कृष्णा दावणे यांसह शिक्षक -शिक्षिका,कर्मचारी व विध्यार्थी उपस्थित होते.
वाचन प्रेरणा दिनानिमित्त विविध उपक्रम शाळेत राबविण्यात आले. डॉ.अब्दुल कलाम यांच्या व्यक्तिरेखा साकारलेल्या विध्यार्थ्याचे गुलाब पुष्प देऊन कौतुक करण्यात आले.
वाचन प्रेरणा दिनानिमित्त ग्रंथ प्रदर्शन भरविण्यात आले होते. प्राचार्य श्री. कुंभार यांच्या शुभहस्ते ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. वाचन प्रेरणा दिनानिमित्त’वाचलं तर वाचाल’या विषयावर व्ही.टी. कांबळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्रशलेतील विज्ञान विषयाचे शिक्षक श्री.प्रशांत गुरव यांनी ‘जागतिक हात धुवा दिना’चे महत्त्व प्रात्यक्षिकातून विध्यार्थ्यांना सांगितले.
कु.रोहिणी नेवरेकर व कु.शीतल कस्तुरे या विद्यार्थिनींनी वाचन प्रेरणा दिन विषयी भाषण केले.
इ.९ वी तु. क चे वर्गशिक्षक श्री.आर.पी.पाटील व सर्व विध्यार्थी यांनी प्रशलेतील ग्रंथालयासाठी ५१ पुस्तके भेट दिली.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इ ९ वीची विद्यार्थिनी कु.मनस्वी तर्डेकर हिने केले. आभार कु.समीर साबळे याने मानले.

आजरा तालुका गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगापासून मुक्त करण्याचे अभियान.

गर्जना प्रतिष्ठान ने हाती घेतले आहे. मंगळवार दि. १७ ऑक्टोबर २०२३ रोजी उत्तूर विद्यालय, उत्तूर येथे आणि बुधवार दि. १८ ऑक्टोबर २०२३ रोजी आजरा हायस्कुल, आजरा येथे १००० मुलींना लसीकरण केले जाणार आहे. ९ ते १८ वयोगटातील सर्व मुलींना याचा लाभ घेता येणार आहे. त्याबद्दल दि.१६ रोजी माहितीसंत्र संपन्न झाले. लसी विषयी माहिती, कॅन्सर ची कारणे व विद्यार्थिनीच्या लसी विषयी शंका याबद्दल उत्तूर विद्यालय व आजरा हायस्कुल येथे कोल्हापूर कॅन्सर सेंटर च्या कार्यकारी संचालिका डॉ रेश्मा पवार यांच्या सहकार्याने डॉ आरती देशमुख यांनी मार्गदर्शन केले. देण्यात येणारी लस ही अत्यंत सुरक्षित असून गर्भाशयाच्या कॅन्सर चा धोका टाळण्याचा एकमेव पर्याय आहे अशी माहिती देण्यात आली. यावेळी आजरा नगरपालिकेच्या प्रथम नगराध्यक्ष सौ ज्योत्स्ना चराटी पाटील, आजरा हायस्कुल चे मुख्याध्यापक कुलकर्णी सर, उत्तूर विद्यालय चे मुख्याध्यापक अमनगी सर,गर्जना प्रतिष्ठानचे अध्यक्ष दिगंबर मिसाळ, सचिव संतोष बेलवाडे, उमेश पारपोलकर, राहुल कांबळे,शिक्षक वृंद, उपस्थित होत्या. ६०० विद्यार्थीनी आणि पालकांनी यामध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला. बाहेरून ही लस घ्यायची झाली तर एक डोस साठी ४००० रू एका व्यक्तीला खर्च येतो त्यामुळे मोफत उपलब्ध करून दिलेल्या या लसीचा जास्तीत जास्त मुलींनी उपयोग करून घ्यावा असे आवाहन गर्जना प्रतिष्ठान च्या वतीने करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.