HomeUncategorizedकेंद्र व राज्य शासनाच्या भूलथापांना नागरिकांनी बळी पडू नये.- युवा सेना सरचिटणीस...

केंद्र व राज्य शासनाच्या भूलथापांना नागरिकांनी बळी पडू नये.- युवा सेना सरचिटणीस मुंबई कृष्णा पाटील यांचा सरकारवर हल्लाबोल.( आजऱ्यातील आठवडा बाजारामध्ये शिवसेनेच्या वतीने ‘ होऊ द्या चर्चा ‘ या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद.)

केंद्र व राज्य शासनाच्या भूलथापांना नागरिकांनी बळी पडू नये.- युवा सेना सरचिटणीस मुंबई कृष्णा पाटील यांचा सरकारवर हल्लाबोल.
( आजऱ्यातील आठवडा बाजारामध्ये शिवसेनेच्या वतीने ‘ होऊ द्या चर्चा ‘ या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद.)

आजरा.- प्रतिनिधी.

केंद्र व राज्य शासनाच्या भूलथापांना नागरिकांनी बळी पडू नये युवा सेना सरचिटणीस मुंबई कृष्णा पाटील यांनी सरकारवर शुक्रवार दि. १३ रोजी हल्लाबोल केला ते आजऱ्यातील आठवडा बाजारामध्ये शिवसेनेच्या वतीने ‘ होऊ द्या चर्चा ‘ या उपक्रमाच्या माध्यमातून नागरिकांशी बोलत होते नागरिकांच्या कडून या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. श्री पाटील पुढे म्हणाले केंद्र व राज्य शासन रोज एका नव्या योजनेची घोषणा करून योजना प्रत्यक्षात कागदावर असते परंतु जनतेची दिशाभूल करून एकीकडे जीवनावश्यक वस्तू पेट्रोल डिझेल गॅस यांचे दर गगनाला पोहोचले आहेत. शेतकऱ्याच्या पिकाला हमीभाव नाही. वन्य प्राण्यापासून होत असल्याची पिकाची नुकसान व जीवितास धोका असताना योग्य ती नुकसान भरपाई मिळत नाही. याकडे दुर्लक्ष दुसरीकडे शासनाचे ग्रामीण भागातील जनतेकडे सातत्याने दुर्लक्ष होत आहे. सरकारी दवाखान्यात औषधे नाहीत लहान मुलासह वयोवृद्ध नागरिक रुग्णालयात मृत्यूमुखी पडत आहेत. व मुख्यमंत्री दिल्ली दौरे करत आहेत. यांना येणाऱ्या २०२४ च्या निवडणुकीत जागा दाखवण्याची जबाबदारी तुमची आमची आहे. पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी कोरोना काळात घरात बसून जे काम केलं यांना मंत्रालयात बसून करता येत नाही. अशी परिस्थिती या सरकारची आहे. यासाठी मतदार राजा जागा हो उद्धव ठाकरे शिवसेनेचा धागा हो अशी घोषणा यावेळी श्री पाटील यांनी केली. यावेळी शिवसेना उपजिलहाप्रमुख, नगरसेवक संभाजी पाटील,शिवसेना तालुकाप्रमुख युवराज पोवार,शिवसेना शहर प्रमुख ओंकार माद्याळकर, युवासेना उपजिल्हा प्रमुख, आजरा तालुका संघ संचालक महेश पाटील, शिवशक्ती भीमशक्तीचे तालुका अध्यक्ष नारायण कांबळे दिनेश कांबळे तसेच दयानंद भोपळे युवा सेना , शिवसेना पदाधिकारी सर्व शिवसैनिक व पदाधिकारी उपस्थित होते. तालुकाप्रमुख श्री पवार यांनी आभार मानले.


यावेळी नागरिकांनी महागाई विविध योजना फक्त कागदावर आहेत मग शासन आपल्या दारी व घरकुल योजना याबाबत सरकारच्या विरोधातील भूमिका मांडली.

Previous article
Next article
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.