कोल्हापूर जिल्ह्यातील लॉक डाऊन मध्ये रविवार रात्री 12:00 वाजले पासून शिथिलता- : जिल्हाधिकारी दौलत देसाई यांचे नवीन आदेश.
कोल्हापूर प्रतिनिधी: २२
कोल्हापूर जिल्ह्यात करणेत आलेला कडक लॉक डाऊन रविवारी रात्री १२:०० वाजले पासून शिथिल होणार असल्याचे आज जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आजच्या बैठकीत सांगितले.
कोल्हापूर जिल्ह्यात कडक लॉक डाऊन केल्या मुळे कोरोना संसर्गाची साखळी तुटण्यासाठी मदत होत आहे .
कडक लॉक डाऊन असाच पुढे ठेवायचा की राज्यसरकारचे नियम नुसार सुरू ठेवायचे या बाबतीत आज जिल्हाधिकारी यांनी बैठक घेतली .
या बैठकी मध्ये रविवारी रात्री मध्यरात्री पासून लॉक डाऊन हा राज्य सरकारच्या नियमावली प्रमाणेच सुरू राहणार असल्याचे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी सांगितले .तसे त्यांनी या बाबतचे आदेश देखील काढण्यात आल्याचे सांगितले.
राज्य सरकारच्या नियमावली नुसारच केवळ सात ते अकरा या वेळेत भाजीपाला ,दूध ,किराणा दुकाने,इत्यादी आस्थापने सुरू राहणार असल्याचे सांगितले .एक जून पर्यंत सकाळी सात पर्यंत अश्या पद्धतीने लॉक डाऊन असेल असे जाहीर केले.
एकंदरीत कडक लॉक डाऊन पूर्वी लागू केलेले निर्बंध कायम असल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.
कोल्हापूर जिल्ह्यातील लॉक डाऊन मध्ये रविवार रात्री 12:00 वाजले पासून शिथिलता- : जिल्हाधिकारी दौलत देसाई यांचे नवीन आदेश.
RELATED ARTICLES