HomeUncategorized१२ वर्षीय मुलीवर बलात्कार प्रकरणाने हादरली महाकाल नगरी…🛑दिल्लीतील निर्भया बलात्कार प्रकरणाची पुनरावृत्ती…...

१२ वर्षीय मुलीवर बलात्कार प्रकरणाने हादरली महाकाल नगरी…🛑दिल्लीतील निर्भया बलात्कार प्रकरणाची पुनरावृत्ती… 🛑मंत्रालयात दलालांचा मुक्त वावर आणि सामान्य जनतेवर कठोर निर्बंध.- महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले.

१२ वर्षीय मुलीवर बलात्कार प्रकरणाने हादरली महाकाल नगरी…
🛑दिल्लीतील निर्भया बलात्कार प्रकरणाची पुनरावृत्ती… 🛑मंत्रालयात दलालांचा मुक्त वावर आणि सामान्य जनतेवर कठोर निर्बंध.- महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले.

सह्याद्री न्युज.- अपडेट

मध्य प्रदेशातील उज्जैनमध्ये दिल्लीतील निर्भयासारखे बलात्कार प्रकरण समोर आल्यानंतर राजकारणही तापले आहे. राहुल गांधींसह अनेक नेत्यांनी याप्रकरणी संताप व्यक्त केला आहे. महाकालचे शहर उज्जैनमध्ये दिल्लीतील निर्भयासारखे बलात्काराचे प्रकरण समोर आले आहे. बलात्कारानंतर अल्पवयीन मुलीच्या प्रायव्हेट पार्टवर खोल जखमा आढळून आल्यात. अडीच तास ती अर्धनग्न अवस्थेत महाकाल नगरीत फिरत राहिली. कुणीही मदत केली नाही. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही याप्रकरणी X वर आपली नाराजी व्यक्त करत राज्य सरकारला धारेवर धरले आहे. त्यांनी लिहिले की, मध्य प्रदेशात एका 12 वर्षांच्या मुलीवर झालेला भयानक गुन्हा भारतमातेच्या हृदयाला धक्का देणारा आहे. मध्यप्रदेशमध्ये महिलांविरोधातील गुन्हे आणि अल्पवयीन मुलींवरील बलात्काराचे प्रमाण सर्वाधिक आहे. याशिवाय राज्यातील भाजप सरकारही मुलींचे रक्षण करण्यास असमर्थ आहे. न्याय नाही, कायदा आणि सुव्यवस्था नाही आणि अधिकार नाहीत. आज मध्य प्रदेशातील मुलींच्या स्थितीची संपूर्ण देश लाजतो आहे. पण राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आणि देशाच्या पंतप्रधानांना अजिबात लाज नाही. त्यांनी निवडणुकीतील भाषणे, पोकळ आश्वासने आणि खोट्या घोषणांमध्ये आपल्या मुलींच्या किंकाळ्या दडपल्या आहेत.

एसआयटी स्थापन👉 गृहमंत्री नरोत्तम मिश्रा

गृहराज्यमंत्री नरोत्तम मिश्रा यांचे वक्तव्यही समोर आले आहे. उज्जैन प्रकरणाच्या तपासासाठी एसआयटी स्थापन करण्यात आल्याचे ते सांगतात. एका संशयितालाही ताब्यात घेण्यात आले आहे. चौकशी केली जात आहे. चौकशीच्या आधारे कठोर कारवाई केली जाईल. भाजपचे प्रदेशाध्यक्ष विष्णुदत्त शर्मा यांनी ही घटना दुःखद असल्याचे म्हटले आहे. नराधमाला फाशीची शिक्षा झाली पाहिजे. हा प्रकार अत्यंत दुर्दैवी आहे. दोषींना कोणत्याही किंमतीत सोडले जाणार नाही. कडक तरतुदी करणार. गुन्हेगार कोणीही असला तरी तो सुटू शकणार नाही.

संशयिताची चौकशी करत आहे

या प्रकरणी पोलिस अधीक्षक सचिन शर्मा यांनी तपास सुरू असल्याचे सांगितले. कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. संशयिताला ताब्यात घेऊन त्याची चौकशी करण्यात येत आहे. तांत्रिक पुरावे आणि परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे पोलीस चौकशी करत आहेत. मुलीच्या वैद्यकीय अहवालाची प्रतीक्षा आहे. मुलीने तिच्या आईबाबत कोणतीही सविस्तर माहिती दिलेली नाही. तज्ज्ञ डॉक्टरांच्या वैद्यकीय पथकाकडून मुलीवर उपचार सुरू आहेत.

काय प्रकरण आहे.

सोमवारी महाकाल पोलीस स्टेशन हद्दीतील मुरलीपुरा रोडवर एक अल्पवयीन मुलगी बेशुद्ध अवस्थेत आढळून आली, तिच्या प्रायव्हेट पार्टवर गंभीर जखमा होत्या आणि तिला पाहताच ती कुठल्यातरी क्रूरतेची शिकार झाली असावी असा अंदाज बांधता येतो. सिंहस्थ बायपास रोडवरील वसाहतीमध्ये ही अल्पवयीन अर्धनग्न अवस्थेत सुमारे अडीच तास भटकत राहिली मात्र तिला कोणीही मदत केली नाही मात्र ती मुरलीपुरा केदंडी आश्रमाजवळ पोहोचली असता कोणीतरी डायल 100 वर याची माहिती दिली आणि महाकाल पोलिसांनी ताब्यात घेतलं. अल्पवयीन मुलगी रक्ताने माखलेली असल्याने तिला तातडीने पोलिस ठाण्यात आणण्यात आले. त्यामुळेच तिला तात्काळ चरक हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले आणि वैद्यकीय उपचार करण्यात आले, तिथे जेव्हा डॉक्टरांनी मुलीच्या प्रायव्हेट पार्टला गंभीर दुखापत झाल्याची पुष्टी केली तेव्हा तिला ताबडतोब इंदूर हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले जेथे प्राथमिक उपचारानंतर तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली.

🟥मंत्रालयात दलालांचा मुक्त वावर आणि सामान्य जनतेवर कठोर निर्बंध.- महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले
( मंत्रालयात येण्यापासून सर्वसामान्यांना रोखणे ही हुकुमशाही.🛑

  • शासन जनतेच्या दारी जाते तर मग जनता शासनाच्या दारी का येते?
    (🛑भारत मातेपेक्षा नरेंद्र मोदी मोठे आहेत का?)
मुंबई – राज्यातील शिंदे सरकारला केंद्रातील भाजपा सरकारच्या हुकूमशाही कारभाराची लागण झालेली आहे. केंद्र सरकार मुठभर लोकांसाठी काम करते तसेच राज्य सरकारही काम करत आहे. सरकार सामान्य जनतेची कामे करण्यासाठी आहे, मुठभर लोकांसाठी नाही.आपले काम स्थानिक पातळीवर होत नाही म्हणूनच लोक मंत्रालयात येत असतात. मंत्रालयात दलालांना मुक्त वावर आहे आणि सुरक्षेचे कारण पुढे करून सर्वसामान्य जनतेला मात्र मंत्रालयात प्रवेश नाकारला जात आहे, असा घणाघाती आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.
🟥यासंदर्भात बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, गुजरातमध्ये एक हुकूमशाही व्यवस्था सुरु झाली तीच व्यवस्था २०१४ पासून केंद्रात आली आणि आता हीच हुकूमशाही व्यवस्था महाराष्ट्रात आली आहे. मंत्रालयात दररोज हजारो लोक आपल्या कामांसाठी येतात, स्थानिक प्रशासनाकडे हेलपाटे घालूनही त्यांचे काम होत नाही.मंत्री फक्त आश्वासने देऊन मोकळे होतात पण त्याची कार्यवाही होत नाही म्हणून शेवटी लोक मंत्रालयात येतात, काहीजण आत्महत्या करण्याचा प्रयत्नही करतात. कोणीही आत्महत्या करु नये हीच आमची भूमिका आहे पण लोक जीव देण्यापर्यंत का जातात? याचा सरकारने विचार करायला हवा.
शासन आपल्या दारी म्हणत कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी व केवळ जाहीरातबाजी केली जात आहे प्रत्यक्षात या कार्यक्रमातून काही साध्य होत नाही म्हणून तर लोक मंत्रालयात येतात. काम होत नाही म्हणूनच आत्महत्या करण्यापर्यंत टोकाचे पाऊल उचलतात, सर्वसामान्य जनतेला मंत्रालयात प्रवेश मर्यादित करणे त्यासाठी जाचक अटी घालणे ही हुकूमशाहीप्रवृत्ती आहे.हे जाचक नियम लागू न करता सर्वसामान्यांना मंत्रालयातील प्रवेश सुलभ करण्यावर सरकारने भर द्यावा. मंत्रालयात प्रवेश करण्यासाठी मोठ्या रांगा लागतात, त्यांच्यासाठी कोणत्याही सोयी नाहीत, जनता ही राजा आहे, त्यांचा सन्मान झाला पाहिजे
.
🟥आजच्या मंत्रालयाला पूर्वी सचिवालय नाव होते, माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांनी त्याचे नाव बदलून मंत्रालय असे केले, त्यामागे सर्वसामान्य जनतेला या वास्तूशी जोडण्याचा त्यांचा उदात्त हेतू होता. सरकार जनतेसाठी आहे, मंत्री महोदयांनी ते प्रशासनाच्या मदतीने चालवणे अपेक्षित आहे. असे असताना केवळ सुरक्षेचे कारण पुढे करुन व गर्दी कमी करायची यासाठी प्रवेशापासून वंचित ठेवण्याचा प्रकार संताप आणणारा आहे, असेही नाना पटोले म्हणाले.

सरकारचा दलाल कंत्राट वाटप करतो.

राज्यातील येड्याच्या सरकारने एका व्यक्तीला तिजोरीच्या चाव्या दिल्या असून हा सरकारचा दलाल निर्मल बिल्डिंगमध्ये बसून भरमसाठ किमतीला कंत्राटाचे वापट करतो. जनतेच्या घामाचा पैसा कंत्राटदारांना देऊन उधळपट्टी सुरु आहे. अशा दलालांना मंत्रालयात मुक्त वावर आहे आणि सर्वसामान्य जनतेला निर्बंध लावले जात आहेत. सरकारच्या या दलालाचा भांडाफोड काँग्रेस पक्ष लवकरच करणार आहे.

🅾️जातीनिहाय जनगणना करा, सर्व समाजाचे प्रश्न मार्गी लागतील.

भारतीय जनता पक्षाने २०१४ पासून समाजात तेढ निर्माण करणारे विषारी बिज पेरले आहे, त्याचा आता काटेरी वृक्ष झाला आहे. भाजपा कोणत्याच समाजाला काहीच देणार नाही ते फक्त आश्वासने देतात. जातीनिहाय जनगणना करण्याची मागणी काँग्रेस पक्ष, सोनियाजी गांधी व राहुलजी गांधी यांनी केली आहे.
🅾️मोदी सरकारने जातनिहाय जनगणना केली तर सर्व समाजाचे प्रश्न सुटण्यास मदत होईल पण भाजपा जातनिहाय जनगणना करणार नाही. महागाई, बेरोजगारी या जनतेच्या मुळ प्रश्नावर मोदी सरकारकडे उत्तर नाही म्हणून ते समाजात तेढ निर्माण करुन मुख्य विषयांपासून जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न करत असतात.

👉भारतमातेपेक्षा नरेंद्र मोदी मोठे आहेत का?

भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रप्रेम, हिंदुत्व, हे बेगडी आहे. भाजपा कोणाचाच नाही तो फक्त सत्तेचे भुकेला आहे, सत्तेसाठी ते काहीही करु शकतात. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अहमदनगर शहरातील दौऱ्यात भारत मातेच्या घोषणा दिली जात असताना या घोषणा थांबवून बावनकुळे यांनी नरेंद्र मोदींच्या घोषणा द्यायला लावल्या. भाजपला भारतमाता, प्रभू श्रीरामांपेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी मोठे वाटतात, अशी टीका नाना पटोले यांनी केली आहे.
कांद्याप्रश्नी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना नाना पटोले म्हणाले की, भाजपाचे सरकार हे शेतकरी विरोधी आहे. कांद्याला बाजारात चांगला भाव मिळत असताना त्याचा निर्यात कर ४०% वाढवून भाव पाडले व शेतकऱ्याला मिळणारे पैसे हिरावून घेतले. टोमॅटोला चांगला भाव मिळत होता पण पुन्हा बाजारात भाव पाडले.
🟪शेतकऱ्याचा माल बाजारात येताच भाव पाडून शेतकऱ्याचे पैसे मिळणार नाहीत याची व्यवस्था केली जाते. एकीकडे शेतमालाला भाव मिळत नाही तर दुसरीकडे शेती साहित्यावर जीएसटी लावला जातो, खते, बियाणे, डिझेलचे दर वाढवले जात आहेत. भाजपा सरकारला शेतकऱ्यांचे काहीही देणेघेणे नाही, असेही नाना पटोले म्हणाले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.