HomeUncategorizedमृत्युंजय'कार शिवाजी सावंत स्मृतिदिनानिमील ग्रंथदिंडी व प्रतिमापूजन कार्यक्रम संपन्न. - 🛑जनता गृहतारणला...

मृत्युंजय’कार शिवाजी सावंत स्मृतिदिनानिमील ग्रंथदिंडी व प्रतिमापूजन कार्यक्रम संपन्न. – 🛑जनता गृहतारणला ३० लाख ६८ हजारांचा निव्वळ नफा.- अध्यक्ष मारुती मोरे

🛑 मृत्युंजय’कार शिवाजी सावंत स्मृतिदिनानिमील ग्रंथदिंडी व प्रतिमापूजन कार्यक्रम संपन्न. – 🛑
जनता गृहतारणला ३० लाख ६८ हजारांचा निव्वळ नफा.- अध्यक्ष मारुती मोरे

आजरा. – प्रतिनिधी.

आजरा नगरीचे सुपुत्र, ख्यातनाम साहित्यिक ‘मृत्युंजय’कार शिवाजी सावंत यांच्या स्मृतिदिनानिमित्त श्रीमंत गंगामाई वाचन मंदिरातर्फे आजरा शहरातून ग्रंथदिंडी व शिवाजी सावंत यांच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली. व्यंकटराव हायस्कूल येथे आजरा महान शिक्षण मंडळाचे अध्यक्ष जयवंतराव शिंपी यांच्या हस्ते सरस्वतीपूजन करण्यात आले. आजरा अर्बन बँकेचे चेअरमन डॉ. अनिल देशपांडे यांच्या हस्ते ग्रंथदिंडीचे पूजन करण्यात आले तर जनता बँकेचे चेअरमन मुकुंदादा देसाई यांच्याहस्ते श्रीफळ वाढवून ग्रंथदिंडीचा शुभारंभ करण्यात आला. यानंतर वाचन मंदिराच्या सभागृहात वाचनालयाचे अध्यक्ष डॉ. अशोक वाचूळकर यांच्या हस्ते शिवाजी सावंत यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. वाचनालयाचे जेष्ठ संचालक श्री संभाजीराव इंजल यांनी उपस्थीतांचे स्वागत व प्रास्ताविक केले. ग्रंथदिंडीत आजरा हायस्कुल, व्यंकटराव हायस्कूल, पंडित दीनदयाळ विद्यालय, आण्णा भाऊ इंग्लीश स्कुल, रोझरी इंग्लीश स्कुल, आजरा महाविद्यालयाचे एन. सी. सी. पथक शिक्षक व मान्यवर सहभागी झाले होते. या कार्यक्रमाला नगराध्यक्षा ज्योत्सा चराटी, उपनगराध्यक्षा अस्मिता जाधव, विलास नाईक, संभाजी पाटील, मारुतीराव मोरे, संभाजीराव सावंत, बंडोपंत चव्हाण, शिवाजीराव पाटील, एस डी सरदेसाई, राजेंद सावंत, शुभांगी सावंत, धनश्री देसाई, प्राचार्य श्री राजेंद्र कुंभार, संदीप देसाई, वाचनालयाच्या उपाध्यक्षा गीता पोतदार, कार्यवाह विजय राजोपाध्ये, सुभाष विभुते महंमदअली मुजावर, रविंद्र हुक्केरी, डॉ. अंजनी देशपांडे, विद्या हरेर, सुचेता गडडी, पंकज कांबळे, संतोष डांग, ग्रंथपाल चंद्रकांत कोंडुसकर, निखील कळेकर, महादेव पाटील, शिवाजी नाईक आदी उपस्थित होते. कार्यवाह सदाशिव मोरे यांनी सुत्रसंचालन करून उपस्थीतांचे आभार मानले.

🛑 जनता गृहतारणला ३० लाख ६८ हजारांचा निव्वळ नफा.- अध्यक्ष मारुती मोरे
( संस्थेची २२ वी वार्षिक सभेत शिवराज्याभिषेक जनता बाँडचे अनावरण.)

आजरा येथील जनता सहकारी गृहतारण संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न झाली या सभेत शिवराज्याभिषेक जनता बाँडचे वार्षिक सभेत अनावरण करण्यात आले. संस्थेला ३० लाख ६८ हजार ४०१ रुपयांचा निवळ नफा झाला असून सभासदांना ११ टक्के लाभांश देणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष मारुती मोरे यांनी दिली. ते संस्थेच्या २२ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अध्यक्षस्थानावरून बोलत होते. दीपप्रज्वलन फोटोपूजनाने सभेला सुरुवात झाली. श्रद्धांजलीचा ठराव संचालक विनायक चव्हाण यांनी मांडला. स्वागत व प्रास्ताविक संचालक प्रो. डॉ. अशोक बाचूळकर यांनी केले. सभेची
नोटीस वाचन व आर्थिक पत्रकांचे वाचन मॅनेजर मधुकर खवरे यांनी केले. नफा विभागणीचे वाचन
उपाध्यक्ष गणपतराव आरळगुंडकर यांनी केली. संस्थेकडे ७३ कोटी ५३ लाख ९४ हजारांच्या ठेवी
असून ५२ कोटी ८० लाख ७० हजारांची कर्ज वाटप केली आहेत. संस्थेच्या सर्व शाखा संगणकीकृत
असून गडहिंग्लज व कोल्हापूर या स्वमालकीच्या इमारतीत तर गारगोटी. इचलकरंजी. सांगली व
पाटणे फाटा येथे शाखांचे कामकाज सुरू आहे. संस्थेला महाराष्ट्र राज्य कार्यक्षेत्र मिळालेले आहे
संस्थेने आजपर्यंत कोणत्याही बँकेकडून कर्ज न घेता व्यवहार सुरू ठेवले आहे. सभासदांचे मिळणारे
पाठबळ व सहकार्य यामुळेच हे शक्य झाले आहे असे अध्यक्षीय मनोगतात मारुती मोरे यांनी सांगितले.
शिवराज्याभिषेक सोहळ्याला ३५० वर्षे पूर्ण होत असून संस्थेने शिवराज्याभिषेक जनता बाँड सुरु केला आहे. याबद्दल सर्व संचालकांचा अभिनंदनाचा ठराव सभासद संभाजीराव इंजल यांनी मांडला. सभेत सेवानिवृती. पदोन्नती, शिष्यवृत्ती. दहावी, बारावी. पदवीधर सभासदांचे पाल्य यासह वेगवेगळ्या क्षेत्रात प्राविण्य मिळविलेल्या सभासदांचा गौरव चिन्ह, शाल व ग्रंथ भेट देऊन सत्कार करण्यात आला. सभेला संस्थेचे सर्व संचालक, शाखा सल्लागार अध्यक्ष, अधिकारी, कर्मचारी व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रशासकीय अधिकारी मारुती कुंभार यांनी आभार मानले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.