HomeUncategorizedवि .मं. सरंबळवाडी. प्राथमिक शाळेत प्रेरणादायी पालक मेळावा संपन्न. - सोहाळे- बाची...

वि .मं. सरंबळवाडी. प्राथमिक शाळेत प्रेरणादायी पालक मेळावा संपन्न. – सोहाळे- बाची व सोहाळेवाडी शाळेच्या विद्यार्थ्यांकडून पालकांचे पाद्यपूजन.

वि .मं. सरंबळवाडी. प्राथमिक शाळेत प्रेरणादायी पालक मेळावा संपन्न.

आजरा.- प्रतिनिधी.

कुमार वि.मं. सरंबळवाडी. ता. आजरा येथे पालक मेळावा उत्साहात संपन्न झाला.” आईच कुटूंबाचे, समाजाचे भविष्य उज्ज्वल करू शकते ” असे उद्गार मेळाव्यासाठी निमंत्रित पाहुणे शिवाजी नांदवडेकर सर (माजी सरपंच वाटंगी व माजी निवृत्त मुख्याध्यापक) यांनी काढले. मेळाव्याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीतील शिक्षणप्रेमी सदस्य चंद्रकांत पाटील (आबा) यांनी भविष्यात होणत्या स्पर्धात्मक परिक्षा व इतर आवश्यक गोष्टींसाठी होणाऱ्या खर्चाची जबाबदारी “पाटील वाडा प्रतिष्ठान व पाटील परिवार'” घेईल असे पालकांसमीर घोषित केले. तसेच त्यांनी ‘उत्कृष्ट
पालक स्पर्धा घेण्याचा मानसही व्यक्त केला. याप्रसंगी कु. पृथ्वीराज सर्जेराव चव्हाण याचा तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत द्वितीय क्रमांक आला म्हणून उलट अध्यक्ष व सदस्यांन
मार्फत सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षा ग्रामपंचायत सरपंच सौ. सुनिता कांबळे घ्या होत्या. एस.एम.सी अध्यक्ष संजय होडगे तसेच सर्व सदस्य उपस्थित होते. प्रास्ताविक सौ घाटगे मॅडम, तर सुत्रसंचालन सौ भारती चव्हाण मॅडम, आभार सौ पाटील मॅडम मानले प्रमुख पाहूण्यांचा परिचय व कार्यक्रमाचे नियोजन श्री. बागडी सर यांनी केले. या पालक मेळाव्यासाठी सर्व विद्यार्थी व पालक यांचे मोलाचे योगदान लाभले
.

सोहाळेसह बाची व सोहाळेवाडी शाळेच्या विद्यार्थ्यांकडून पालकांचे पाद्यपूजन.

सोहाळे (ता.आजरा) येथील प्राथमिक शाळेत ग्रुप ग्रामपंचायत सोहाळे, बाची, दोरुगडेवाडी व सर्व शाळा व्यवस्थापन समिती यांच्या संयुक्त विद्यमाने पाद्यपूजन कार्यक्रम व पालक मेळावा उत्साहात पार पडला. यावेळी विद्यार्थ्यांनी पाद्यपूजन करून गुरुजी व आईवडीलांच्या प्रती ऋण व्यक्त केले. यावेळी गुरुचे आपल्या आयुष्यात असलेले महत्व, आपली संस्कृतीचे पालन करणे व जतन करणे याचे महत्व समजून घेतले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच सौ. भारती डेळेकर होत्या.
प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक संजय बागडी यांनी केले. यावेळी अध्यक्षीय भाषणात बोलताना सरपंच सौ. डेळेकर यांनी विद्यार्थी व गुरुंबद्दलचे महत्व स्पष्ट केले. यानिमित्त शिक्षक संजय मोहीते यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी सुभाष केसरकर, सूर्यकांत दोरुगडे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास ग्रा. पं. सदस्य, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष शिवाजी कोंडूसकर, उपाध्यक्षा उर्मिला नेवरेकर, पांडूरंग दोरुगडे, शिवाजी दोरुगडे, उत्तम तुरंबेकर, रिजवाना नायकवडी, संगिता कोंडूसकर आदी उपस्थित होते. सुत्रसंचालन शिक्षक नागेश सुतार यांनी करुन आभार मानले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.