राज्यातील २६ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या. -पहा त्या अधिकाऱ्यांची नावे.
मुंबईः- प्रतिनिधी.२१
राज्यावर कोरोनाचं भलंमोठं संकट आहे. या संकटातही राज्य सरकारच्या खांद्याला खांदा लावून पोलीस विभागातील कर्मचारी काम करतायत. कोरोना संकटातही पोलीस दिवसरात्र काम करत असून, त्यांच्यावरही प्रचंड ताण आहे. विशेष म्हणजे या कोरोना काळात पोलिसांच्या बदल्या करण्यात आल्यात. राज्यातील 26 पोलीस निरीक्षकांना सहाय्यक आयुक्त/उपविभागीय अधिकारीपदी बढती देण्यात आलीय. बढती देण्यात आलेल्या पोलीस अधिकार्यांची नावे, त्यांची सध्याची नियुक्ती आणि बढतीनंतरच्या नियुक्तीच्या ठिकाणाची माहिती खाली देण्यात आलेली आहे. (maharashtra police Transfers of 26 police inspectors in the maharashtra, complete list at a click)
बढती देण्यात आलेल्या पोलीस अधिकार्यांची नावे
संजय लक्ष्मण पवार (पोलीस निरीक्षक, पुणे शहर ते सहाय्यक पोलिस आयुक्त, पुणे शहर)
इंद्रजित वसंत काटकर (पोलीस निरीक्षक, रायगड ते उपविभागीय पोलिस अधिकारी, शाहुवाडी उपविभाग, कोल्हापुर)
मधुकर सखाराम गावित (पोलीस निरीक्षक, अनुसूचित जमाती प्रमाणपत्र पडताळणी समिती, नाशिक ते सहाय्यक आयुक्त, नाशिक शहर)
हेमंत मोतिराम मानकर (पोलीस निरीक्षक बीड ते उपविभागीय पोलीस अधिकारी, कन्नड उपविभाग, औरंगाबाद)
मीरा तातोबा बनसोडे (पोलीस निरीक्षक, नवी मुंबई ते सहाय्यक आयुक्त, नवी मुंबई)
विजयालक्ष्मी शिवशंकर होतेगौडा (हिरेमठ विजयालक्ष्मी विद्यारान्या) (पोलीस निरीक्षक, बृहन्मुंबई ते सहाय्यक पोलिस आयुक्त, नागपूर शहर)
संभाजी सुदाम सावंत (पोलीस निरीक्षक, पोलिस प्रशिक्षण केंद्र, तुरची, तासगांव, सांगली ते उपविभागीय पोलीस अधिकारी, अक्कलकुआ उपविभाग, नंदूरबार)
जयप्रकाश मधुकर भोसले (पोलीस निरीक्षक, बृहन्मुंबई ते सहाय्यक पोलिस आयुक्त, बृहन्मुंबई)
शैलेश प्रभाकर जाधव (पोलीस निरीक्षक, महाराष्ट्र पोलिस अकादमी, नाशिक ते वाचक पोलिस उप अधीक्षक, विशेष पोलिस महिनिरीक्षक, नाशिक परिक्षेत्र)
मुकुंद गोपाळ पवार (पोलीस निरीक्षक, राज्य गुप्तवार्ता विभाग ते सहाय्यक पोलिस आयुक्त, बृहन्मुंबई)
राजू धोंडीराम मोरे (पोलीस निरीक्षक, पुणे शहर ते उपविभागीय अधिकारी, परतूर उपविभाग, जालना)
भरत शेका गायकवाड (पोलीस निरीक्षक, बृहन्मुंबई ते सहाय्यक पोलिस आयुक्त, अमरावती शहर)
सुशील प्रभू कांबळे (पोलीस निरीक्षक, बृहन्मुंबई ते सहाय्यक आयुक्त, बृहन्मुंबई)