राष्ट्रीयकृत बैंक प्रतिनिधींची बैठक घेणेबाबत.-आजरा ग्राहक पंचायत महाराष्ट्र.- कमिटीचे निवेदन.
आजरा. – प्रतिनिधी.
नागरिकांची हक्काची बँक म्हणजे राष्ट्रीयकृत बैंक होय. अनेक नागरिकांना काही बँक कर्मचारी चुकीची वागणूक देतात व मनमानी पद्धतीने नियम लावून हेलपाटे घालण्यास भाग पाडतात. सदरच्या बँकेमार्फत बचत गटांना कर्ज देणे, बचत गटांची बचत खाती काढणे, त्याच बँका मार्फत चालू आहे. मात्र नवनवीन नियम काढून महिलांना त्यांच्या खात्यावरील सेव्हिंग खात्याचे पैसे देणे नकार देणे, बचत गटाची कर्ज प्रकरणे मंजूर न करता काहीतरी कुरापत काढणे, काही बँका शाळेच्या मुलांना झिरो बजेटवर खाती न उघडता त्यांचे पैसे भरून घेणे, पासबुक वेळेवर भरून न देणे. अशा बऱ्याच तक्रारी ग्राहकमंच कडे आल्या आहेत.
याकरिता तालुक्यातील बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बैंक, एस.बी.आय बँक व ज्या राष्ट्रीयकृत बँका असतील त्या सर्व प्रतिनिधींना आपले स्तरावर बोलावून व ग्राहक मंच कार्यकर्ते यांना एकत्रित बोलावून बैठक घेणे आवश्यक आहे. तातडीने बैठक न झाल्यास व बँकांच्या तक्रारी वाढत गेल्यास बँकेच्या दारात शांततेच्या मार्गाने आंदोलन करावे असे निवेदन ग्राहक पंचायत महाराष्ट्र कमिटीच्या वतीने आजरा तहसिदार यांना निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनावर काँ. शिवाजी गुरव सह नागरिकांच्या सह्या आहेत.
