साऊ श्रमिक महिला संस्था, वाटंगी प्राथमिक आरोग्य केंद्राची आजरा- एमआयडीसीत.- आरोग्य तपासणी शिबीर संपन्न.
आजरा. प्रतिनिधी.
आजरा येथील साऊ श्रमिक महिला संस्था व वाटंगी प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने एमआयडीसी आजरा येथील लघु उद्योग क्षेत्रातील स्त्री पुरुष कामगार यांची आरोग्य तपासणी शिबीर शनिवार दि. १२ ऑगस्ट २०२३ रोजी संपन्न झाले. सद्या सुरु असलेल्या पावसाळी वातावरणामुळे तालुक्यात सर्व ठिकाणी सर्धी, ताप, खोकला अशा साथीच्या आजाराचे प्रमाणात वाढ सुरु आहे. याचे गांभीर्य लक्षात घेता एम आय डीसी येथे बरेच कामगार कंपनीत कार्यरत आहेत. त्यांच्या आरोग्याचा विचार करून एकदिवसीय आरोग्य शिबीर घ्यावे असे सर्वानुमते नियोजन करण्यात आले. वाटंगी प्राथमिक आरोग्यकेंद्राच्या पारेवाडी विभागाच्या सी. एच.वो डॉ. वैशाली चौगुले यांचे साऊ संस्थेच्या पदाधिकारी पद्मिनी पिळणकर यांनी स्वागत करून त्यांच्या मार्गदर्शनाखाली कामगारांची तपासणी करून त्यांना औषध वाटप करण्यात आले. या शिबीरास एमआयडीसीतील विविध उदयोजक महादेव पोवार, सौ. सरस्वती पोवार, शिवाजी पाटील, भिकाजी कुंभीरकर, दयानंद भुसारी, पांडुरंग फेशिककर, त्रिभुवने, मोरे, सदानंद तोडकर, डॉ. ठाकूर-शर, नार्वेकर, गुलाब शिखलगार, हैदर नाईक या सर्वांचे प्रामुख्याने सहकार्य लाभले. सौ. आरती माळी यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले. यावेळी . संख्येचे पदाधिकारी रेखा दोरुगडे, मिनाज कानडीकर, प्रसाद पिळणकर, संध्या पाटील. व सर्व सदस्य उपस्थित होते.
