हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ व सुंदर अभियान.- प्रवासी व नागरिकांच्या सहकार्याची गरज. ( एसटी आगारातील शासनाच्या विविध सवलतीचा लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा. – आजरा आगार व्यवस्थापक राजेंद्र घुगरे )
आजरा. – प्रतिनिधी.

आजरा येथील एस. टी आगार वतीने हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ व सुंदर अभियान अंतर्गत १ मे २०२३ ते ३० एप्रिल २०२४ कालावधी अभियानामध्ये सहभाग असून आजरा येथील एसटी स्टँड परिसर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी या अभियानात प्रवासी व नागरिकांच्या सहकार्याची गरज आहे. तसेच आजरा एसटी आगारातील शासनाच्या विविध सवलतीचा लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा. याबाबतची माहिती आजरा आगार व्यवस्थापक राजेंद्र घुगरे यांनी दि. १५ ऑगस्ट रोजी माहिती दिली. व्यवस्थापक श्री. घुगरे माहिती देताना पुढे म्हणाले नव्याने झालेले आजरा बस स्थानक स्वच्छ व सुंदर ठेवण्याची जबाबदारी आगाराची असून यासाठी प्रवासी व नागरिकांची गरज असते यासाठी आजरा शहरातील काही संस्थांनी व लोकप्रतिनिधींनी बस स्थानकासाठी सहकार्य केले आहे. यामध्ये आजरा अर्बन बँक, जनता गृहतारण, स्वामी विवेकानंद पतसंस्था, तसेच संवेदना फाउंडेशन, माजी. जि प उपाध्यक्ष जयवंतराव शिंपी, दाभिल लोकनियुक्त सरपंच युवराज पाटील या सर्वांच्या सहकार्यातून आजरा बस स्थानकावर माहिती डिजिटल फलक, स्वच्छ पाण्यासाठी फिल्टर, रंगरंगोटी, बगीच्या उद्यानासाठी बाकडी, सेल्फी पॉईंट व देव कांडगाव विभाग निवारा स्थानक अशा वेगवेगळ्या सुविधांसाठी सहकार्य केले आहे. सध्या आजरा आकार “ब” वर्ग मध्ये जिल्ह्यात क्रमांक दोन वर आहे. तर राज्यात चार क्रमांकावर आहे. जिल्ह्यात व राज्यात आजरा आधार प्रथम क्रमांक येण्यासाठी आपल्याला सर्वांच्या सहकार्याची गरज आहे. तसेच नव्याने उपलब्ध झालेल्या सेमी लक्झरी हिरकणी बस सेवा वेगवेगळ्या मार्गावर देण्याचे नियोजन आहे यामध्ये मुंबई परेल पुणे स्वारगेट पंढरपूर असे असून प्रवासाने खाजगी सेवेचा प्रवास टाळून महामंडळ गाड्यांचे सेवा घ्यावी व सुखद प्रवास करावा.
आजरा आगाराच्या प्रवाशांसाठी विविध योजना.
यामध्ये महिला सन्मान योजना ५० टक्के सवलत, वैद्यकीय एचआयव्ही रुग्ण शंभर टक्के सवलत, अहिल्याबाई होळकर योजना, जेष्ट नागरिक, अपंगासाठी व्हीलचेअर व प्रवास सवलत, अशा वेगवेगळ्या सवलतीचा लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन केले.
सुरक्षित सेवा कर्मचारी विल्ले वाटप चालक
आजरा आजारातील सुरक्षित वाहतूक बिल्ले लाभार्थी कर्मचारी दहा वर्षातील सेवा चालक व पाच वर्षातील चालक यामध्ये पात्र चालक १० वर्षे. १) मारुती लकमले २)अरुन पाटील, ३) नितीन पारपोलकर, तर ५ वर्षे सेवेत सुरक्षित सेवा बिल्ले चालक यामध्ये १) पुरुषोत्तम कन्नाके, राजू पंधरे, कमलाकर अत्राम, नितीन लाड, गिरीश पोवार, सुनील पाटील, धीरज फगरे, जितेंद्र कांबळे या लाभार्थींचा सहभाग आहे सदर लाभार्थींचा १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त आगार व्यवस्थापक यांच्या हस्ते सत्कार संपन्न झाला.

या स्वच्छ सुंदर अभियानात सर्व प्रवासी नागरिक आणि सहभाग घेऊन सहकार्य करावे व विविध योजनेचा लाभ घ्यावा याबाबतची माहिती देण्यात आली सूत्रसंचालन वरिष्ठ लिपिक वासुदेव जोशी यांनी केले. यावेळी सहाय्यक.वाहतूक निरीक्षक आयुब मुल्ला, आगारातील प्रशासन कर्मचारी चालक वाहक कार्यशाळा कर्मचारी उपस्थित होते.
