अवकाळी पावसामुळे
शेतकऱ्यांचे विद्युत पंप .गेले पाण्याखाली. नुकसान भरपाई मिळावी.- श्रमिक मुक्ती दलाची मागणी.
आजरा. प्रतिनिधी. दि. १९.
आजरा तालुक्यात
चक्रीवादळामुळे झालेल्या व अवकाळी पावसामुळे हिरण्यकेशी नदीची पाणी पातळी अचानक वाढल्याने अनेक शेतकऱ्यांचे पंप पाण्याखाली गेले आहेत. कोरोनामुळे आधीच अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांचे या अवकाळी पावसाने प्रचंड नुकसान झालेले आहे. या नुकसानीचे पंचनामे होऊन तातडीने विद्युतपंपाची शंभर टक्के नुकसान भरपाई मिळालीच पाहिजेत याबाबत चे श्रमिक मुक्तीदलाच्या वतीने दिले आहे. याबरोबर वादळामुळे झाडे उन्मळून पडली आहेत, घरांचे पत्रे, खापर्या उडून गेल्या आहेत. त्यांचेही पंचनामे होऊन योग्य नुकसान भरपाई मिळाली पाहिजे. याबाबत तहसीलदार आजरा यांना लॉकडाऊन उठल्यानंतर प्रत्यक्ष भेटून आम्ही निवेदन देणार आहोत. तरी तहसीलदार आजरा यांनी सर्कल, तलाठी, महावितरण व कृषी विभागाचे प्रतिनिधी यांना योग्य ते निर्देश देऊन पंचनामे करावेत असे आवाहन श्रमिक मुक्ती दलाने केले आहे. असे दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. या श्रमिक मुक्ती दलाचे प्रसिध्दी पत्रकावर कार्याध्यक्ष कॉ संपत देसाई, प्रकाश मोरुस्कर, मुकुंद नार्वेकर, कृष्णा सावंत, मारुती पाटील, सयाजी कोडक, नंदकुमार देसाई, निवृत्ती फगरे, मयुरेश देसाई, पांडुरंग देसाई, अतुल देसाई, यशवंत कोडक, दिलीप देसाई या शेतकऱ्यांच्या सह्या आहेत.