भारतीय जनता पक्षाच्या मराठा नेत्यांची बैठक संपन्न….
मुंबई. प्रतिनिधी १९
मुंबईमध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची अध्यक्षते खाली महाराष्ट्रातील प्रमुख भाजपा मराठा समाजाच्या नेत्यांची बैठक संपन्न झाली.
यावेळी महाराष्ट्र मध्ये भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा यांच्या अध्यक्षतेखाली मराठा समाजाची कोअर कमिटी करण्यात आली. या कोअर कमिटी मध्ये पश्चिम महाराष्ट्रातून खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व युवा नेते समरजित सिंह घाडगे यांची नेमणूक करण्यात आली.
या बैठकीस खासदार नारायण राणे आमदार विनायक मेटे , विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर माजी मंत्री हर्षवर्धन पाटील उपस्थित होते .
यावेळी राज्य सरकारने मराठा समाजाला आरक्षण कसे देता येईल यासाठी ही अभ्यास कमिटी काम करणार आहे व स्वतंत्रपणे न्यायालयामध्ये आपली भूमिका मांडणार आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे यासाठी प्रसंगी जनतेमध्ये जाऊन आंदोलन उभा केले जाईल न्यायालयीन लढा लढला जाईल कोणत्याही परिस्थितीमध्ये भारतीय जनता पक्ष मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे असे या बैठकीमध्ये ठरले.