आजऱ्यात मणिपूर घटनेच्या निषेधार्थ रँली काढण्याचा – राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रीय काँग्रेस व विविध पुरोगामी संघटनांचा बैठकीत निर्णय.
आजरा :- प्रतिनिधी.

महात्मा गांधी,जोतिबा फुले, सावित्रीबाई फुले, छत्रपती,शिवाजी महाराज, संभाजी महाराज,साईबाबा यांच्याबद्दल अपशब्द उद्गार काढल्याबद्दल व मणिपूर येथे महिलांची नग्न धिंड काढल्याच्या निषेधार्थ आजरा येथे १४ आँगष्ट रोजी निषेध रँली काढण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रीय काँग्रेस व विविध पुरोगामी संघटनांच्या वतीने आयोजित बैठकीत घेण्यात आला.अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालूकाध्यक्ष मुकुंदराव देसाई होते. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष जयवंतराव शिंपी म्हणाले, मोदी शब्दावरून राहुल गांधी यांची खासदारकी जाते.परंतु महात्मा गांधी, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांचा खालच्या पातळीवर आपमान करूनही कारवाई केली जात नाही.हा दुटप्पीपणा आहे.याविरोधात ताकदीने उतरण्याची गरज आहे. माजी सभापती अल्बर्ट डिसोझा म्हणाले,केंद्र सरकार धार्मिक धृवीकरणातून सत्ता कायम राखण्याचा खटाटोप करत आहे.धार्मिक व जातीव्यवस्थेचे वर्चस्व ठेवण्यासाठी अल्पसंख्याक, दलितांना डिवचण्याचा प्रयत्न केला जात आहे. जेष्ठ साहित्यीक प्रा.राजाभाऊ शिरगुप्पे म्हणाले,मणिपूर घटनेने संपूर्ण देश हादरला आहे. तरी सरकार याकडे डोळेझाक करत आहे.महिलांची धिंड काढली जाते परंतु केंद्र सरकार बघ्याची भूमिका घेते.त्यामुळे शासनाचा याला पाठिंबा असल्याचे स्पष्ट होते. यावेळी झालेल्या चर्चेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालूकाध्यक्ष तानाजी देसाई, पर्यावरण काँग्रेस समितीचे तालूकाध्यक्ष कृष्णा सावंत, संजय घाटगे,दशरथ घुरे,गिता पोतदार,विष्णू जाधव आदींनी चर्चेत सहभाग घेतला. याप्रसंगी प्रा.डॉ. नवनाथ शिंदे,प्रा.मिना मंगळूरकर,जोतिबा चाळके,युवराज जाधव,प्रकाश मोरस्कर,शिवाजी भगूत्रे,डॉ.धनाजी राणे,पुष्पलता घोळसे,डॉ.गौरी भोसले आदी उपस्थित होते.काँ.संपत देसाई यांनी प्रास्ताविक केले.काँ संजय तर्डेकर यांनी आभार मानले.
