शालेय रेकॉर्डमध्ये खाडाखोड करणे, कागद चिकटुन त्यावर शिक्षकांच्या सह्या घेण सह .- डॉ. झाकिर हुसेन अॅग्लो उर्दू हायस्कुल व ज्युनिअर कॉलेज आजरा – माजी मुख्याध्यापक व लिपिकावर गुन्हा दाखल.
आजरा.- प्रतिनिधी.
डॉ. झाकिर हुसेन अॅग्लो उर्दू हायस्कुल व ज्युनिअर कॉलेज आजरा येथे शालेय रेकॉर्डमध्ये खाडाखोड करणे, कागद चिकटुन त्यावर शिक्षकांच्या सह्या घेणे, बाबत आजरा पोलिसात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे यातील
फिर्यादीचे नाव व पत्ता – गजानन तानाजी उकिर्डे, वय 53 वर्ष, व्यवसाय उपशिक्षणाधिकारी माध्यमिक विभाग, जिल्हा परिषद, कोल्हापूर असून या गुन्ह्यातील आरोपीचे नाव व पत्ता – जमशिद दस्तगिर जमादार, बुडेखान याह्याखाना निजाम दोघे रा. आजरा, दि – 03/04/2013 रोजी ते दि. 30/09/2022 – रोजीचे दरम्यान मुदतीत, डॉ. झाकिर हुसेन अॅग्लो उर्दू हायस्कुल व ज्युनिअर कॉलेज आजरा, ता. आजरा येथे
गुन्हातील फसवणुक बनावट दस्ताऐवज बनवुन व अभिलेखावर खाडाखोड – करुन बोगस शिक्षक भरती व नेमणुकस मान्यता प्रस्ताव सादर करणे हकीगत यातील आरोपीत नं. 1 हे डॉ. झाकिर हुसेन अँग्लो उर्दू हायस्कुल व ज्युनिअर कॉलेज, आजरा येथे माजी मुख्यादापक व आरोपीत नं 2 हे लिपीक आहेत. यातील आरोपीत यांनी शालेय अभिलेखे दाखवले नाहीत. व जे दाखवले त्या शालेय रेकॉर्डमध्ये खाडाखोड करणे, कागद चिकटुन त्यावर शिक्षकांच्या सह्या घेणे, नोंदणीमध्ये फेरफार करणे, जनरल रजिस्टर मध्ये खाडाखोड करुन बोगस दाखले देणे या सारखे निंदनिय प्रकार शाळेच्या अभिलेखामध्ये प्रकार केल्याबाबत यातील फिर्यादी यांनी दिले फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास अंमलदार – पो.हे.कॉ.2152 शेळके करत आहेत.
