जिल्हाधिकारी दौलत देसाई यांची आजरा कोंव्हिड सेंटरना भेट.
आजरा. प्रतिनिधी. दि. १८.
आजरा येथील दोन्ही कोंव्हिड सेंटरना
जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आजरा तालुक्याच्या दौऱ्यादरम्यान ग्राम समिती यांच्याशी चर्चा केली तसेच त्यांच्या कार्याबद्दल समाधान व्यक्त केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर वस्तीग्रह येथील सीसीसी केंद्रास भेट देऊन उपचार घेणाऱ्या रुग्णांची विचारपूस केली तसेच नव्याने सुरु करण्यात आलेल्या रोजरी कोविड काळजी केंद्रास भेट देऊन तेथील वैद्यकीय अधिकारी यांच्याशी चर्चा केली . ग्रामीण रुग्णालय आजरा या ठिकाणी नियोजित असलेल्या ऑक्सीजन प्लांट च्या जागेची पाहणी केली सध्या ग्रामीण रुग्णालय आजरा येथे २५ बेड ऑक्सिजन लाईन टाकण्याचे काम सुरू होत आहे. यावेळी उपविभागीय अधिकारी संपत खिलारी, तहसीलदार विकास अहिर, नगराध्यक्षा ज्योस्त्ना चराटी तसेच सर्व तालुकास्तरीय अधिकारी उपस्थित होते.