पुढील २४ तासांत रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यासह राज्यातील अनेक भागांत अतिमुसळधार पावसाची शक्यता. गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील अनेक भागांत पावसाचा जोर वाढला.-
राज्यात काही भागात पूरस्थिती.
मुंबई :- प्रतिनिधी.
गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील अनेक भागांत पावसाचा जोर वाढला आहे. पुढील २४ तासांत मुंबई, ठाणे तसेच रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे.
जुलै महिन्यात अनेक दिवस पावसाने दडी मारली होती. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून पाऊस पुन्हा सक्रिय झाला असून राज्यात पुढील काही दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान, मुंबई, ठाणे शहरांत पुढील २४ तासांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. तर, पालघर आणि रायगड जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.
