Homeकोंकण - ठाणेआजरा शिवसेनेने केला भाजप नेते किरट सोमय्या यांचा निषेध..( "किरट सोमय्या कोण...

आजरा शिवसेनेने केला भाजप नेते किरट सोमय्या यांचा निषेध..( “किरट सोमय्या कोण रे पायतान मारा दोन रे” घोषणांनी परिसर दणाणून सोडला. )

आजरा शिवसेनेने केला भाजप नेते किरट सोमय्या यांचा निषेध..
( “किरट सोमय्या कोण रे पायतान मारा दोन रे” घोषणांनी परिसर दणाणून सोडला. )

आजरा. – प्रतिनिधी

भाजप नेते किरट सोमया यांची असशील चाळे करताना बाहेर पडलेली व्हिडिओ क्लिप या निषेधार्थ आजरा येथील संभाजी महाराज चौकात शिवसेनेच्या वतीने निषेध करण्यात आला. यावेळी शिवसैनिकांनी किरीट सोमय्या कोण रे पायतान मारा दोन रे, उद्धव ठाकरे आप आगे बढो हम आपके साथ है, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला.
यावेळी बोलताना तालुकाप्रमुख युवराज पवार म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदीजी भाजप सरकारने किरट सोमय्या यांना झेड प्लस सुरक्षा ही असले धंदे करण्यासाठी दिली आहे का ?ताबडतोब या किरीट सोमय्या याच्यावर गुन्हा दाखल करावा व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री गृहमंत्री देवेंद्र फडणीस यांनी जर सोमया याच्यावर गुन्हा दाखल नाही केला तर पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हटल्याप्रमाणे आपण खरोखरच महाराष्ट्राला लागलेला कलंक आहे. प्रथम या सोमया वरील झेड प्लस सुरक्षा रद्द करण्यात यावी अशी मागणी करत भाजप नेते किरण सोमय्या यांचा निषेध करून त्यांच्या प्रतिमाला चिखल लावून प्रतिमा पायाने तुडविण्यात आली या आंदोलनात उपजिल्हाप्रमुख संभाजी पाटील, तालुकाप्रमुख राजेंद्र सावंत, उप तालुका प्रमुख शिवाजी आढाव, जयसिंग पाटील, युवा सेनेचे महेश पाटील विभाग प्रमुख दिनेश कांबळे दयानंद भोपळे सह पदाधिकारी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

( किरट सोमय्या यांची प्रतिमा शिवसैनिक चिखलामध्ये पायाने तुडवत असताना पोलिस बंदोबस्ताने विरोध करत काढून घेतली.)

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.