HomeUncategorizedसमृद्धीवर पुन्हा अपघात, भरधाव कार 30 फूट खाली कोसळल्याने पतीचा जागीच मृत्यू,...

समृद्धीवर पुन्हा अपघात, भरधाव कार 30 फूट खाली कोसळल्याने पतीचा जागीच मृत्यू, पत्नी आणि मुलगा जखमी.

समृद्धीवर पुन्हा अपघात, भरधाव कार 30 फूट खाली कोसळल्याने पतीचा जागीच मृत्यू, पत्नी आणि मुलगा जखमी.


मुंबई. – प्रतिनिधी.

समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका सुरुच असून बुलढाण्यात समृद्धी महामार्गावर बसला भीषण अपघात होऊन 26 जणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आणखी एक अपघाताची घटना समोर आली आहे. समृद्धी महामार्गावर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात कारला 30 फूट खाली कोसळून पतीचा जागीच मृत्यू तर पत्नी आणि मुलगा गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे.

▪️ 30 फूट खाली कोसळली कार
प्राप्त माहितीनुसार, संभाजीनगर तालुक्यातील जयपूर-भांबर्डा शिवारात पहाटेच्या सुमारास संभाजीनगरहून जालनाच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव कारवरील चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटून समृद्धी महामार्गाच्या डाव्या बाजूला जवळपास 30 फूट खाली कोसळली. या अपघातामध्ये चालक पतीचा जागीच मृत्यू झाला. तर पत्नी आणि मुलगा जखमी झाले आहेत.

▪️सुशीलकुमार थोरात असं अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. ते वाशिम जिल्ह्यातील मालेगाव येथील रहिवासी आहेत. त्यांच्यासोबत कारमध्ये असलेली त्यांची पत्नी आणि बाळ हे या अपघातात जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी संभाजीनगरला पाठवण्यात आले आहे. या अपघातामध्ये कारचा पूर्ण चक्काचूर झालाय.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.