HomeUncategorizedराजकारणात कोण कोणाचा शत्रू नाही - कोण कोणाचा मित्र नाही.- राज्यातील गढूळ...

राजकारणात कोण कोणाचा शत्रू नाही – कोण कोणाचा मित्र नाही.- राज्यातील गढूळ झालेले राजकारण भविष्यात सामान्य जनता.- मनात जागा देणार का?

राजकारणात कोण कोणाचा शत्रू नाही – कोण कोणाचा मित्र नाही.- राज्यातील गढूळ झालेले राजकारण भविष्यात सामान्य जनता.- मनात जागा देणार का?

राजकीय.- विश्लेषण.

राज्यातील गढूळ झालेले राजकारण – सामान्य जनतेसाठी लाजिरवाणे.- सोयीचे राजकारण करणाऱ्या राजकीय मंडळी भविष्यात सामान्य माणसाच्या मनात जागा राहणार का ? असा प्रश्न जन माणसाच्या मनात. उपस्थित होत आहेत.
गरज सरो वैद्य मरो.. अशीच परिस्थिती आहे. यामागील राजकीय घडामोडी पाहता त्यांचा वापर करून घेतला आता ह्यांचा वापर किती दिवस आहे हा देखील संशोधनाचा भाग आहे. येणारी २०२४ ची विधानसभा निवडणूक या गढूळ झालेल्या राजकारणात जनता योग्य दिशा दाखवणार आहे. दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून शिकार करणे असाच याचा अर्थ आहे सर्वसामान्य जनतेची पिळवणूक वाढती महागाई याकडे या स्वार्थी राजकीय लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत आहे.
विरोधी पक्षाच्या नेत्याच्या विरोधात जाऊन एखाद्या नेत्याने पक्षासाठी चांगल्या पद्धतीने काम करणे व अचानक अशा पक्षासाठी नेतृत्व करणाऱ्या नेत्यांचा विचार न करता वरिष्ठ पातळीवर रात्रीत खेळ चालून निर्णय होणे हा एक धक्काच म्हणावा लागेल. आता ही युती किती महिन्यापूर्वी ठरली होती ही काही महिन्यानंतर समजेल
अशा परिस्थितीत प्रामाणिकपणे निष्ठेने पक्षाचे काम करणाऱ्या नेत्यांचे हाल होत आहेत सद्यस्थितीला त्यांची काय परिस्थिती असेल राजकीय समीकरणे बदलणार असल्याने आपली राजकीय वाटचालीचे काय होणार हा विचार नक्कीच करण्याची वेळ विभागातील पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्यावर व कार्यकर्त्यांच्या वर येणार आहे.
आता काही दिवसातच किंवा तासातच विधानसभा अध्यक्ष यांची एन्ट्री होईल व प्रलंबित सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयाची अंमलबजावणी होऊन भाजप राष्ट्रवादी सरकार पुढील कालावधीसाठी कार्यरत राहील.व लवकरच “मी पुन्हा येईन” म्हणणारे महाराष्ट्राचे नवीन मुख्यमंत्री असतील अशीच सध्या महाराष्ट्रात चर्चा आहे. म्हणजे खुर्चीसाठी किती खालच्या पातळीला जाऊन राजकारण करायचं हे महाराष्ट्राच्या काही दळभद्री नेत्याकडून शिकाव
म्हणजे असे घडल्यास आता सर्वसामान्य जनतेला देखील राजकारण कळू लागल आहे. यामुळे जनता आता शहाणी झाली आहे आपलं चाललेलं राज्यातील घाणेरडे राजकारण हे महाराष्ट्राला दिशा देणारे नसून दिशाहीन झाले आहे. अशा ग्रामीण भागातील शेतकरी नागरिकांच्या प्रतिक्रिया येत आहे.
आता अहोरात्र पक्षासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचं एकमेकांशी जमणार का कालपर्यंत एकमेकांच्या विरोधात शंखध्वनी करणाऱ्या मोजमापे काढणाऱ्या टीका विरोध करणाऱ्या कार्यकर्ते व नेत्यांना आपल्या मागील विरोधी पक्षाच्या नेत्यांच्या समोर बसावं लागेल निर्णयाचे, आदेशाचं पालन करावे लागेल हे स्वाभिमानी कार्यकर्ते ते सहन करणार आहेत का कदाचित असा प्रश्न कार्यकर्त्यांच्या मनात येत असावा पण आपलेच दात आपलेच होत असे म्हणून सुविचार राजकारणात सक्रिय राहण्याचा कदाचित निर्णय देखील काहींच्या मनात येत असेल. पण या चाललेल्या राजकारणाला जनता धडा शिकवेल..असे सद्यस्थितीत वातावरण आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात इतकी सत्तालोलूपता आणि करंटेपणा कधी बघायला मिळाला नाही.. एकीकडे. समृद्धीच्या महामार्गाच्या अपघाताने अवघा महाराष्ट्र हादरलेला असतांना आणि त्या २५ मृतदेहाच्या चिता जळत असतांना राजभवनात शपथविधी सुरु होता. चितेची आगही विझू दिली नाही. खरंच हा महाराष्ट्र संवेदनशील राहिला नाही का?? या महाराष्ट्राला दिशाहीन करणारे नेते भविष्याच्या राजकारणात त्यांना जनता दिशा दाखवणार का?

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.