राष्ट्रीय महामार्ग संकेश्वर – बांधा.- नादुरुस्त झालेला रस्ता दुरुस्त करा.- शेतकऱ्यांची नुकसान भरपाई ताबडतोब द्यावी.- आजऱ्यात शिवसेना – मनसे आक्रमक. ( आजरा तहसील, राष्ट्रीय महामार्ग अधिकारी, इंजि. मनसे – शिवसेना पदाधिकारी बैठक संपन्न. )
रस्ते विकासाला आमचा विरोध नाही पण नागरिकांना धोकादायक अपघाती रस्ते तात्पुरते तरी दुरुस्त करा. ( शिवसेना, महामार्ग अधिकारी, इजि, तहसीलदार बैठक संपन्न.)
आजरा. – प्रतिनिधी.

संकेश्वर बांदा होत असलेला राष्ट्रीय महामार्ग या महामार्गाला आमचा विरोध नाही आमचा विरोध विकासाला नसून आमचा विरोध होत असलेले काम व पावसामध्ये खुदाई करून ठेवलेला रस्ता हा धोकादायक झाला आहे. संभाव्य व होत असलेले अपघात यासाठी खुदाई करून व नवीन साकवा वरील खुदाई केलेले रस्ते तात्काळ दुरुस्त करा व ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी रस्त्यामध्ये गेलेत व कोकणातील नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना ज्या पद्धतीने ताबडतोब नुकसान भरपाई त्यांच्या खात्यावर जमा केली त्या पद्धतीने गडहिंग्लज व आजरा तालुक्यातील नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना बाजारभावापेक्षा अधिक नुकसान भरपाई मिळावी याबाबत शिवसेना व मनसे यांनी वेगवेगळी निवेदने देऊन याबाबत सक्षम अधिकारी बोलवून बैठक लावावी अशा आशयाचे निवेदन दोन्ही पक्षाकडून दिले होते. त्या अनुषंगाने आजरा तहसीलदार समीर माने यांच्या अध्यक्षतेखाली दि.३० रोजी तहसीलदार आजरा येथील सभागृहात शिवसेना व मनसे यांचे वेगवेगळ्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राष्ट्रीय महामार्गाचे जबाबदार अधिकारी डेप्युटी इंजि. आर. बी. शिंदे यांना सदर बैठकीस बोलवून नागरिकांचे प्रश्न सोडवणूक करण्यासाठी बोलण्यात आले होते. यावेळी प्रथम शिवसेनेच्या झालेल्या बैठकीत शिवसेना तालुकाप्रमुख युवराज पोवार यांनी राष्ट्रीय महामार्गात आम्ही अडथळा निर्माण करत नाही. आम्हाला रस्ते विकासाला विरोध नाही. पण रस्ते विकास करत असताना सर्वसामान्य जनता व शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये याची खबरदारी घ्यावी. यामध्ये चंदगड संपर्कप्रमुख सुनील शिंत्रे उपजिल्हाप्रमुख संभाजी पाटील पश्चिम विभाग प्रमुख मारुती डोंगरे सह पदाधिकारी यांनी सूचना केल्या. राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी होत असलेल्या मागणीकडे गोष्टीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. याबाबतच्या त्रुटी व सद्यस्थितीत आपण पावसामध्ये अत्यंत जास्त प्रमाणात पाऊस असणाऱ्या विभागात प्रथम रस्ता करणे गरजेचे असताना या भागांमध्ये काही ठिकाणी एक किलोमीटर अर्धा किलोमीटर अंतरावरचे एक साईट रस्ता केला आहात तो देखील वाहने चालण्यास परवानगी नाही. व ज्या ठिकाणी दुसऱ्या बाजूला खुदा करून ठेवलेला रस्ता वाहने चालण्याच्या परिस्थितीचा नाही. या मार्गावर अपघात होत आहेत. चिखलाचे साम्राज्य आहे. नव्याने बांधलेले साकव ( पुल ) येथील पाणी जाण्याचा मार्ग नाही. बाजूच्या शेतामध्ये माती टाकली आहे. सध्या पेरणी चालू आहे. आपण अद्याप ही माती व मोठमोठे दगड काढून घेतली नाही. तसेच आजरा शहरातून जाणारा रस्ता हा सध्याच्या गटारीच्या बरोबर घ्यावा. अनेक वर्षापासून येथील रहिवासी या ठिकाणी आपल्या वास्तव्यात आहेत. त्यामुळे शहरातून जाणारा रस्ता हा गटारी सोबत घ्यावा. आजरा साखर कारखाना या मार्गावर आहे. जवळपास ४०० कामगार या रस्त्यावरून रहदारी करतात सदर रस्त्यावरून मोटरसायकल चालवताना अपघात होत आहेत. कारखाना गेट समोरील गटारीची उंची असल्याने या ठिकाणी वाहने जाण्या येण्यास तात्पुरते साधन करावे असे वेगवेगळे मुद्दे उपस्थित केले. यावेळी शिवसेना युवा सेनेचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तालुकाप्रमुख राजेंद्र सावंत यांनी बैठकीचे आयोजन केल्याबद्दल आभार मानले.
महामार्गाला आमचा विरोध नाही. खुदाई केलेली रस्ते दुरुस्त करा – अन्यथा ठरलेल्या दिवशी रस्ता रोको आंदोलन होणारच.- मनसे आक्रमक.
( महामार्ग इंजि. आजरा तहसीलदार मनसे यांची बैठक. )
आजरा. – प्रतिनिधी.

आजरा येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने राष्ट्रीय महामार्ग संकेश्वर – बांधा चालू असलेले काम पावसामध्ये होणार नसून आपण खुदाई केलेले रस्ते तसेच नवीन बांधलेले साकव पूल या ठिकाणी रस्ता चिखलमय व अपघात होईल असा धोकादायक पावसात झाला आहे. यासाठी पाऊस संपेपर्यंत रस्ता नादुरुस्त होणार नाही. अशा पद्धतीने खुदाई केलेले रस्ते दुरुस्त करावे तसेच नवीन साकव बांधताना बाजूच्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये आपण माती दगडे टाकला आहात ती बाजूला करून नाल्यातून येणारे पाणी बांधलेल्या नवीन साकवातून मार्गस्थ व्हावे. व शेतकऱ्यांचे होत असलेले नुकसान आपण थांबवावे व गडहिंग्लज आजरा मधील ज्या बाधित शेतकऱ्यांच्या जमिनी राष्ट्रीय महामार्ग मध्ये गेलेले आहेत. त्यांची नुकसान भरपाई ताबडतोब देण्यात यावी. अशा आशयाचे निवेदन आजरा तहसीलदार यांना देण्यात आले होते. या निवेदनात राष्ट्रीय महामार्ग रस्त्याबाबत वेगवेगळे मुद्दे उपस्थित करून निवेदन दिल्याप्रमाणे दोन दिवसात रस्ते दुरुस्त करून घ्यावे व तत्पूर्वी शुक्रवार दि. ३० पर्यंत बैठकीचे आयोजन करण्यात यावे. अन्यथा सोमवार दि. ३ रोजी निषेध व रास्ता रोको करू अशा आशयाचे निवेदन दिले होते. या अनुषंगाने सदर बैठकीचे आयोजन तहसीलदार समीर माने यांनी सक्षम, जबाबदार अधिकारी व डेप्युटी इंजि. आर. बी. शिंदे यांना सदर बैठकीस बोलवून नागरिकांचे प्रश्न सोडून करण्यासाठी बोलण्यात आले होते. सदर बैठकीत श्री शिंदे यांनी मनसे पदाधिकारी यांच्या सूचना ऐकून घेत लागलीच आपण सदर सूचना पालन करत आपले प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन सदर बैठकीत दिले. या बैठकीच्या चर्चा सत्रात जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले उपजिल्हाध्यक्ष सुधीर सुपल तालुका अध्यक्ष अनिल निऊगरे, तालुका उपाध्यक्ष आनंदा घंटे यांनी विविध प्रश्न मांडले यावेळी
सचिव चंद्रकांत सांबरेकर महिला आघाडी अध्यक्ष सरिता सावंत उपाध्यक्ष तेजस्विनी देसाई वि. सेना अश्विन राणे तालुकाध्यक्ष वैष्णव दळवी सह पदाधिकारी शाखा अध्यक्ष मनसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते तालुका उपाध्यक्ष श्री घंटे यांनी बैठक लावून आमचे प्रश्न ऐकल्याबद्दल सर्वांचे आभार मानले. व आपण बैठकीत आश्वासन दिल्याप्रमाणे आपण नादुरुस्त धोकादायक रस्ते दुरुस्त नाही केल्यास ठरल्याप्रमाणे आंदोलन रस्ता रोको करण्यात येईल असे शेवटी सांगितले.
संकेश्वर बांदा महामार्ग रस्त्याची अधिकारी समावेश पाहणी करणार श्रमिक मुक्ती दल. तहसील बैठकीत निर्णय
आजरा. – प्रतिनिधी.

संकेश्वर बांदा महामार्गमुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांचे व नागरिकांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी धनगरमोळा घाटकरवाडी परिसरात सोमवारी प्रत्यक्ष स्थळपाहणी करण्याचा निर्णय आज तहसील कार्यालयात झालेल्या बैठकीत घेण्यात आला. तहसीलदार समीर माने यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला उपाभियंता श्री शिंदे, श्रमिक मुक्ती दलाचे कार्याध्यक्ष कॉ संपत देसाई, प्रकाश मोरूस्कर, निवृती अडकूरकर, शाखा अभियंता अनिल पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. सुरवातीला कॉ संपत देसाई यांनी रस्त्याचे काम चालू होऊन सहा महिने उलटून गेले तरी अद्याप बाधित शेतकऱ्यांच्या जमिनीचे संपादन झालेले नाही. असा मुद्दा उपस्थित करताच या महिन्यात संपादित जमिनीचे मूल्यांकन होऊन नोव्हेंबर महिन्यात कोणत्याही परिस्थितीत संपादनाची रक्कम शेतकऱ्यांना दिली जाईल असे सांगितले गेले. दिली जाणारी रक्कम हीं राष्ट्रीय रस्ते महामार्ग कायद्याने व 2013 च्या राष्ट्रीय भुसंपादन कायद्याने दिली जाईल, शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही याची निश्चितच काळजी घेतली जाईल असेही उपाभियंता श्री शिंदे यांनी सांगितले. रस्त्याचे काम वेगाने सुरु असून रस्त्याकडेला असलेल्या घरात लोकांना ये जा करणे अवघड झाले आहे. असं प्रश्न प्रकाश मोरूस्कर यांनी मांडताच अशा सर्व घराची सोमवारी प्रत्यक्ष स्थळपाहणी करून त्यावर योग्य व न्याय तोडगा काढला जावा. असा निर्णय करण्यात आला. जिथे गरज नाही तिथे वळणावर ज्यादा जमीन संपादन होतं असेल तर त्या वळणाला पर्याय काय आहे का यांचा तपास करण्याचे ठरले. याबरोबर शेतकऱ्याची जमीन संपादन होऊन एक दोन गुंठा क्षेत्र शिल्लक राहत असेल तर त्या सर्व क्षेत्राचे संपादन करण्याचेही ठरले.
आजरा आंबोली हा रस्ता पर्यटन रस्ता असून पावसाळ्यात हजारो पर्यटक दररोज ये जा करतात. हा रस्ता आता वाहतूकसाठी धोकादायक बनला असून कांही अपघात घडल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी नॅशनल हायवे अथरुटी यांनी घ्यावी. असा प्रश्न येताच हा रस्ता या पावसाळ्यात प्रवाशांसाठी वाहतुकीला योग्य होईल असा मुरूम टाकून देण्याची जबाबदारी नॅशनल हायवे अथॉरिटीवर राहिलं असेहीं ठरविण्यात आले.
बैठकीला कॉ संपत देसाई, प्रकाश मोरूस्कर, निवृत्ती अडकूरकर, शिवाजी इंगळे, मिनीन बारदेस्कर, एकनाथ खरुडे, यशवंत जाधव, ईश्वर माडभगत, श्रावण शेटगे, हालेस बारदेस्कर, गोविंद पाटील यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
