Homeकोंकण - ठाणेकोल्हापूर जिल्ह्यातील त्या मुरगुडच्या - बोगस डॉक्टरला अटक, महिलांशी लगट करून बनवायचा...

कोल्हापूर जिल्ह्यातील त्या मुरगुडच्या – बोगस डॉक्टरला अटक, महिलांशी लगट करून बनवायचा अश्लील चित्रफीत..

कोल्हापूर जिल्ह्यातील त्या मुरगुडच्या – बोगस डॉक्टरला अटक, महिलांशी लगट करून बनवायचा अश्लील चित्रफीत..

मुरगूड : – प्रतिनिधी

येथील महिलांशी लगट करून गैरवर्तन करत त्यांच्या चित्रफिती बनवणारा बोगस डॉक्टर दत्तात्रय शामराव कदम याला बुधवारी कागल पोलिसांनी अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे. दरम्यान आपल्याला अटक होऊ नये यासाठी या डॉक्टरने मोठी फिल्डिंग लावली होती; पण शेवटी जनरेट्याने त्याला अटक करावी लागली.
दत्तात्रय कदम हा गेल्या अनेक वर्षांपासून मुरगूड, ता. कागल येथे आयुर्वेदिक औषधे देऊन रुग्णांच्या जखमा बऱ्या करत होता. राज्य परराज्यातून मोठ्या प्रमाणात रुग्ण येत होते. दवाखान्यात येणाऱ्या महिला रुग्णांशी जवळीक करून त्याने अनेकांशी लैंगिक संबंध प्रस्थापित करत त्याच्या चित्रफिती तयार केल्या होत्या. या चित्रफिती मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्याने याची परिसरात जोरदार चर्चा सुरू झाली होती.

याबाबत कोणीच तक्रार देण्यास पुढे येत नव्हते; पण शहरातून सदर चित्रफीत व्हायरल होत होती, तसेच अश्लील फोटोही व्हायरल झाले. शेवटी तीन महिन्यांपूर्वी पोलिसांनी या बोगस डॉक्टरला अटक करावी यासाठी नागरिकांनी पोलिस स्टेशनवर मोर्चा काढला होता. त्यात मुरगूडचे सपोनि विकास बडवे यांनी स्वतः फिर्यादी होत तक्रार दिल्यानंतर या दत्तात्रय कदम यावर गुन्हा नोंद झाला होता. कदम याने न्यायालयातून अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी प्रयत्न केले होते; पण त्याचा अर्ज फेटाळून लावला होता. आज कागलचे पोलिस निरीक्षक ईश्वर ओमासे यांनी त्याला अटक झाल्याची माहिती दिली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.