दारू वाहतूक प्रकरणी सावंतवाडीतील एकाला बांदयात अटक. राज्य उत्पादन शुल्कची मोठी धडक कारवाई. ( गाडीसह दारू मिळून 14 लाख 10 हजार किंमतीचा मुद्देमाल केला जप्त.)
सिंधुदुर्ग :- प्रतिनिधी.
बांदा पिंपळेश्वर मंदिर नजिक गोव्यातून सिंधुदुर्गात येणाऱ्या बेकायदा दारू वाहतूकी विरोधात इन्सुली उत्पादन शुल्क विभागाने कारवाई केली.या कारवाईत 9 लाख 60 हजारांच्या दारूसह एकूण 14 लाख 10 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तर बेकायदा दारू वाहतूक प्रकरणी विठ्ठल बाळकृष्ण परब (रा. सावंतवाडी) याला मुद्देमालासह ताब्यात घेण्यात आले आहे.
गोव्यातून जुन्या महामार्गावरून सिंधुदुर्गात बेकायदा गोवा बनावटीची दारु वाहतूक होणार असल्याची माहिती एक्साईजला मिळाली होती. त्यानुसार विजय सुर्यवंशी आयुक्त राज्य उत्पादक शुल्क महाराष्ट्र राज्य, मा.श्री.सुनील चव्हाण संचालक (अं.व.द.) राज्य उत्पादक शुल्क, महाराष्ट्र राज्य मुंबई, मा.श्री.विजय चिंचाळकर विभागीय उपआयुक्त,राज्य उत्पादक शुल्क कोल्हापूर विभाग कोल्हापूर, मा.श्री.वैभव वैद्य प्र.अधीक्षक,राज्य उत्पादन शुल्क सिंधुदुर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली मिळालेल्या गुप्त बातमीनुसार पत्रादेवी बांदा रोड, पिंपळेश्वर गणेश मंदिराजवळ बांदा, ता.सावंतवाडी जि.सिंधुदुर्ग येथे महिंद्रा कंपनीचे सफेद रंगाचे बोलेरो पिकअप चारचाकी वाहन क्रमांक MH – 07 – P – 0841 सदर वाहनाची तपासणी केली असता सदर वाहनामध्ये गोवा बनावटीच्या विदेशी मद्याच्या राॅयल ब्ल्यू माल्ट व्हिस्की 180 मि.ली.क्षमतेच्या एकूण 9600 बाटल्यांचे 200 बाॅक्स अवैध मद्यसाठा मिळून आला.
आरोपी इसम नाव विठ्ठल बाळकृष्ण परब सावंतवाडी जि.सिंधुदुर्ग यास मुद्देमालासह ताब्यात घेण्यात आले.सदर गुन्ह्यामध्ये अं.रू.9 लाख 60 हजार किंमतीचे मद्य व रूपये 4 लाख 50 हजार किंमतीचे चारचाकी वाहन असा एकुण रुपये 14 लाख 10 हजार किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून,महाराष्ट्र दारूबंदी कायदा 1949 अंतर्गत विविध कलमानुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
सदर कारवाई वैभव वैद्य प्र.अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क सिंधुदुर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली संजय मोहिते, निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क तपासणी नाका इन्सुली, श्री.तानाजी पाटील भ प्रदीप रास्कर दुय्यम निरीक्षक, गोपाळ राणे, स.दू.नि, दिपक वायंदडे, प्रसाद माळी जवान , व रणजित शिंदे, जवान नि. वाहक चालक यांनी केली.
सदर प्रकरणी पुढील तपास दुय्यम निरीक्षक तपासणी नाका इन्सुली श्री.प्रदीप रास्कर हे करित आहेत.
