Homeकोंकण - ठाणेराज्यात अतिवृष्टीचा हवामान अंदाज..- कोकणसह पश्चिम महाराष्ट्रात ऑरेंज अलर्ट तर मुंबईसह ठाण्यात...

राज्यात अतिवृष्टीचा हवामान अंदाज..- कोकणसह पश्चिम महाराष्ट्रात ऑरेंज अलर्ट तर मुंबईसह ठाण्यात यलो अलर्ट.

राज्यात अतिवृष्टीचा हवामान अंदाज..- कोकणसह पश्चिम महाराष्ट्रात ऑरेंज अलर्ट तर मुंबईसह ठाण्यात यलो अलर्ट.

मुंबई:- प्रतिनिधी.

राज्यात आजही पावसाचा जोर कायम राहणार आहे. आज बुधवारी कोकणसह पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट तर मुंबई आणि ठाण्यात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. पुण्यातदेखील घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

देशात मॉन्सूनने उशिरा का होईना दमदार हजेरी लावली आहे. शनिवार पासून मॉन्सून राज्यात देखील सक्रिय झाला आहे. आज अनेक राज्यात अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. मुंबईसह नाशिक, कोकण, पुणे, विदर्भात पावसाचा जोर कायम आहे. आज देखील कोकणसह पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर राज्यातील इतर भागातही चांगल्या पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार रायगड, रत्नागिरी, नाशिक, पुणे आणि सातारा या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. या जिल्ह्यांमध्ये मुसळधार किवा अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. त्यामुळं नागरिकांनी खबरदारी घेण्याचं आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आलं आहे. तर पालघर, मुंबई, ठाणे आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये पावसाचा ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे. राज्यात पावसाचा जोर वाढणार आहे. पुढील ४८ तासांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. बंगालच्या उपसागरातील वाऱ्याच्या स्थितीमुळं मोसमी पावसाचा जोर वाढला आहे.
हवामान विभागाने पुढील दोन दिवस विदर्भात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. तर पुण्यात आज मंगळवारी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
राज्यात अनेक ठिकाणी रविवारी पावसाने हजेरी लावली होती. मंगळवारी देखील मुंबईच्या उपनगरांसह कल्याण, डोंबिवली, ठाणे, नवी मुंबईत सकाळ पासून ते संध्याकाळ पर्यंत मोठ्या पावसाची नोंद झाली. कोकण पट्ट्यामध्ये रत्नागिरी, रायगड ते पालघरपर्यंत मंगळवारी पावसाचा जोर वाढून काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. पालघर आणि रायगड जिल्ह्याला आज यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर उर्वरित ठिकाणी यातीमुळसाधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला. नाशिक, पुणे, सातारा येथील घाट परिसरासाठीही तुरळक ठिकाणी बुधवारी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. विदर्भात अमरावती, नागपूर, वर्धा येथे तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.