रात्रीच्या अंधारात, पावसात तरुणांनी रस्त्यावर पडलेले झाड केले बाजूला. १०८ रुग्णवाहिकेला करून दिला रस्ता रिकामी.
चंदगड. प्रतिनिधी.दि १६
चंदगड आसगोळी येथील दोन धाडसी तरुणांनी रात्रीच्या अंधारात बॅटरीचा प्रकाश दाखवण्यासाठी छोट्या बालकांना सोबत घेऊन आसगोळी येथे रस्त्यात झाड पडले होते १०८ रुग्णवाहिका पेशंट घेऊन आजरा वरून चंदगड कडे जात असताना व रुग्णवाहिका मध्ये पेशंट असताना अशा परिस्थितीत आसगोळी येथील अतुल कडुळकर, सुनील जाधव या धाडसी तरुणाने रात्रीच्या अंधारात व प्रचंड पाऊस असताना रस्त्यावर पडलेले झाड तोडून रुग्णवाहिकेला रस्ता रिकामी करून दिला दरम्यानच्या काळात नजीकच्या किंचेवाडी तिट्टा नजीक एका वाहनावर झाड पडले होते. तेही झाड बाजूला करून त्यांनाही रस्ता रिकामी करून दिला या दोन्ही घटनांमध्ये कोणालाही दुखापत झालेली नाही. परंतु या तरुणांच्या धाडसामुळे रुग्णवाहिकेतील पेशंटला योग्य वेळेत पोहोचता आले. या कोरोणा काळात मदत कोणत्याही स्वरूपात करता येते हे धाडस या तरुणांनी दाखवून दिले आहे. १०८ रुग्णवाहिकेचा चालक व डॉक्टर यांनी या तरुणाचे जाता- जाता आभार मानले.
रात्रीच्या अंधारात, पावसात तरुणांनी रस्त्यावर पडलेले झाड केले बाजूला. १०८ रुग्णवाहिकेला करून दिला रस्ता रिकामी.
RELATED ARTICLES