आजरा हायस्कूल आजरा मध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन संपन्न.
आजरा. – प्रतिनिधी.

आजरा येथील जनता एज्युकेशन सोसायटी आजरा संचलित आजरा हायस्कूल आजरा मध्ये आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला यावेळी योगाचार्य बाळकृष्ण दोरुगडे (सोहाळे) यांनी विद्यार्थ्यांना विविध योगा प्रकार श्लोक व माहिती दिली यावेळी आजरा हायस्कूल आजरा चे सहाय्यक शिक्षक किरण कांबळे सर यांनी काही प्रात्यक्षिके केली, योग शिक्षक दोरुगडे सर यांचा शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला या कार्यक्रमास प्रशालेचे मुख्याध्यापक एस. आर. कुलकर्णी उपमुख्याध्यापक बी .एम. दरी पर्यवेक्षक एस .पी .होलम आजरा हायस्कूल आजरा , व आण्णा भाऊ इंग्लिश स्कूल चे सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमाचे नियोजन क्रिडा विभागाच्या वतीने करण्यात आले सुत्रसंचलन एम एस गोरे यांनी केले तर आभार के के कांबळे यांनी मानले.
देवर्डे शाळेत योग दिन उत्साहात साजरा.

आजरा तालुक्यातील देवर्डे येथील विद्या मंदिर श्री रवळनाथ हायस्कूल मध्ये योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी योगशिक्षक रोहित कुरुणकर उत्तुर व भक्ती साळुंखे इयत्ता सहावी व स्तुती उत्तुरकर इयत्ता पाचवी यांनी योगासना ची विविध आसने विद्यार्थ्यांना दाखवली योगशिक्षक रोहित कुरुणकर भक्ती साळुंखे व स्तुती उत्तुरकर यांचा सत्कार मुख्याध्यापक सुभाष सावंत व नामदेव माईनकर यांनी केला यावेळी सूर्यनमस्कार पश्चिमा तानासन ताडासन वृश्चिक आसन धनुरासन सर्वांगासन ही आसने विद्यार्थ्यांच्या कडून करून घेतली याप्रसंगी सरोजिनी कुंभार रेश्मा बोलके महादेव तेजम सुनील पाटील श्रीकांत पाटील चंद्रकांत घुरे
देवेंद्र शिखरे महेश नावलगी या शिक्षकासह विद्यार्थी शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते सूत्रसंचालन राजेंद्र पाटील यांनी केले आभार देवेंद्र शिखरे यांनी मानले.
