Homeकोंकण - ठाणेयुगपुरुष महात्मा बसवेश्वर. - डाँ. शिवशंकर उपासे आजरा.

युगपुरुष महात्मा बसवेश्वर. – डाँ. शिवशंकर उपासे आजरा.

युगपुरुष महात्मा बसवेश्वर. – डाँ. शिवशंकर उपासे आजरा.
आजरा प्रतिनिधी.
“सामाजिक समता, स्त्री-पुरुषांना आणि शुद्र अतिशुद्रांना समान न्याय सर्वांना सारखेच धार्मिक आणि अध्यात्मिक उपासनेचे अधिकार इ. मूलभूत तत्त्वांचा रुसोच्या अगोदर सहाशे वर्षे बसवांनी पुरस्कार करून आपले पुरोगामित्व आणि सामाजिक धुरीणत्व सिद्ध केले. संत ज्ञानेश्वरांच्या अगोदर १२५ ते १५० वर्षे सामाजिक आर्थिक, धार्मिक, आध्यात्मिक, आणि आदी क्षेत्रांच्या दालन समाजातील अठरापगड जाती जमातींसाठी सताड खुले झाले पाहिजे, असा “आवाज महात्मा बसवेश्वरांनी बाराव्या शतकाच्या बुलंद केला” तीच बसवाची चळवळ होय,” असा डॉ. सोमनाथ रोडे यांच्या बसवेश्वर यांच्या कार्याचा गौरव केला आहे.
कर्नाटकातील बागेवाडी म्हणजे बागलकोट येथे इ.स. सन ११०५ मधील वैशाख शुद्ध तृतीया म्हणजे अक्षय तृतीयेच्या शुभ दिवशी बसवेश्वरांचा जन्म झाला. इ.स. सन ११६७ मध्ये त्यांनी जलसमाधी घेतली मंगळवेढा येथे राजाच्या दरबारात ते कोषागर मंत्री होते. बसवायचे मामा बलदेव यांनी आपली कन्या गंगंबिका हिचा विवाह बसवाशी करून दिला मंगळवेढा येथे ते २१ वर्षे होते. पुढे राजाने कल्याण येथून राज्य करायला प्रारंभ केला त्यावेळी बिज्जळाने बसवेश्वरांना महामंत्री म्हणून कल्याणला नेले प्रामाणिकपणा सतत कार्यमग्नता, चिकाटी, आणि उत्तमजन संपर्क यामुळे बिज्जळ राजाचे ते महामंत्री झाले ते महाराष्ट्रातले जावई होते. ते शैव ब्राह्मण होते. त्यांचा दुसरा विवाह निलांबिका या क्षेत्रीय कन्येशी झाला. त्या दृष्टीने हा आंतरजातीय विवाह होता. “आधी केले मग सांगितले’ अशी त्यांची कामाची पद्धत होती मंगळवेढा आणि कल्याण या दोन्ही राजधान्यांमध्ये व परिसरामध्ये त्यांनी समतेचा प्रसार केला. वीरशैव धर्मात स्त्री-पुरुष या दोघांनीही इष्टलिंग दीक्षा दिली जात असे स्पेलिंग धरण केल्यानंतर त्यांनी पूर्वीचा जात नष्ट होऊन ती लिंगायत होत असत इष्टलिंग धारक लोकांमध्ये रोटी-बेटी व्यवहार केले पाहिजेत हे मत बसवेश्वरांनी लोकांना पटवून दिले मंगळवेढ्यातील २१ व्या वर्षाच्या वास्तव्यात समाजवादी समाजरचनेचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ते झटत राहिले राजदरबारातील कामानंतर गावोगावी जाऊन स्पृश्य व अस्पृश्य समाजातील सखोल निर्माण करण्याचा प्रयत्न अस्पृश्याबरोबर ते सहभोजन करीत प्रत्येक स्त्री पुरुषांना संसारासाठी स्वतःचा व्यवसाय केला पाहिजे. असे आग्रही धरीत. ‘कायकवे कैलास’ हे तत्व त्यांच्या गळी उतरवण्यासाठी प्रयत्न करीत समाजातील सर्व स्तरातील स्त्री-पुरुषांनी कष्ट केले पाहिजेत श्रमाचा – कष्टाचा आग्रह धरणारे एकमेव संत व समाज सुधारक होते. उपजीविकेसाठी व्यक्ती जो उद्योग व्यवसाय करते यालाच बसवेश्वर ‘कायक’ म्हणत म्हणूनच कष्टकरी माणसाला ते “जगद्‍गुरू” मानीत ते आपल्या एका वचनात म्हणतात की ज्याने आपली घामाने हि काळी माती भिजवली । अखंड श्रमाने ज्यांनी आपला देह झिजवला… श्रमाची पूजा करून ज्याने शिवाची पूजा केली.।.. ज्याची वाणी आणि तसेच करणी । हे कुंडलसंगमदेव तोच सदगुरू झाला.। सर्व प्रकारचे ‘कायक’ समानच होते.
‘कायक’ म्हणजे श्रमातून भरपूर संपत्ती मिळाली तर आवश्यक ती ठेवून अतिरिक्त संपत्ती लोककल्याणासाठी द्यावी असा दासोह हा विचार बसवेश्वरांनी मांडला ‘कायक’ म्हणजे उत्पादक आणि ‘दासोह’ म्हणजे वितरक होय. बसवेश्वरांचा धर्म हा आत्मकल्याणापेक्षा समाजकल्याणवर अधिक भर देतो.
अनुभव मंटन- लिंगायत धर्माच्या तत्त्वाची विचारांची साधक-बाधक चर्चा करण्यासाठी बसवेश्वरांनी एक विशाल वास्तू उभी केली बसवेश्वरांच्या समतेच्या विचाराकडे आकृष्ट होऊन अनेक जाती पण त्यातून देशातील लोक कल्याणमध्ये जमा झाले लोकशाही आणि व्यक्तिस्वातंत्र्य हया मौलिक मूल्यांची ती जगातील पहिली संसद होती. शूद्र म्हणून गाजले गेलेले पण बुद्धिमान व अनुभवी अल्लम प्रभुंना त्यांनी अनुभव मंटपाचे अध्यक्षपद दिले. तर अस्पृश्य हरळय्या आणि ब्राह्मण मधुवय्या यांच्या मुला-मुलींची विवाह इथेच थाटाने केला गेला बाराव्या शतकातील आणि मानव आंतरजातीय विवाह बसवेश्वरांच्या समतेच्या मनाच्या व कार्यप्रणालीच्या फार मोठा विजय होता. या मंटपात गुजरात, ओरिसा, काश्मीर, बंगाल, इ. भागांतून शिवशरण स्त्री-पुरुष एकत्र आले होते. या सर्व सभासदांची संख्या १ लाख ५२ हजार इतकी होती त्यातील सातशे शरण व सत्तर शरण स्त्रियांनी आपले आत्मा- अत्मानुभव वचन या साहित्यप्रकारात गुंफले बसवेश्वर आपल्या एका वचनात म्हणतात “दगडाचा देव, देव नाही,, मातीचा देव, देव नाही, अडुसष्ठ तीर्थक्षेत्रांतील देव, देव नाहीत । “मी कोण म्हणून सकल जाणून घेतल्यास स्वतः देव पहा, अप्रमाण कुउलसंमदेवा ।।’ देवा धर्माचे मूळ पहा दयाचे असे ।, सत्य बोलणे हाच देव लोक असत्य बोलणे हाच मृत्यूलोक । आचरण स्वर्ग आनाचरण असे नरक ।।” ही त्यांची वचने प्रख्यात आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.