आजऱ्यात पिसाळलेल्या कुत्र्याच्या चाव्याने सात जण जखमी.- नगरपंचायतने मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा नागरिकांची मागणी.
आजरा.- प्रतिनिधी.
आजरा येथे पिसाळलेल्या कुत्र्याने अंदाजे सात ते आठ जणांना चावा घेऊन जखमी केले आहे यामध्ये दोन बालक सात ते आठ वर्षाची आहेत. या पिसाळलेल्या कुत्र्याला दिवसभर काही नागरिकांनी पकडण्याचा प्रयत्न केला परंतु सदर पिसाळलेले कुत्रे सापडले नाही आज सायंकाळी कुत्र्याच्या हल्ल्यातील जखमीना उपजिल्हा रुग्णालय गडहिंग्लज येथे उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. मागील काही दिवसापूर्वी अशाच एका पिसाळलेल्या कुत्र्याने आजरा शहरात धुमाकूळ घातला होता. आज दि.४ रोजी सायंकाळी कुत्र्याने केलेल्या हल्ल्यात काही जखमींना आजरा ग्रामीण रुग्णालयात तोंडाला चावा घेतल्याने उपचार करण्यासाठी सीपीआर कोल्हापूर कडे दाखल करण्यास सांगितले असता कोल्हापूर मध्ये जाण्यासाठी उशीर होईल यासाठी उपजिल्हा रुग्णालय गडहिंग्लज येथे दाखल करण्यात आले असल्याचे समजते. तरी या पिसाळलेल्या कुत्र्याचा आजरा नगरपंचायतने बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे. अद्याप या पिसाळलेल्या कुत्र्याच्या हल्ल्यात कोण कोण जखमी आहे त्यांची नावे समजू शकली नाहीत. ( सदर कुत्र्यापासून नागरिकांनी सावध राहावे)
