भाग. १
रमी खेळा या बेकायदेशीर खेळावर शासन निर्बंध का.? लावत नाही.- ग्रामीण भागात तरुणांना खेळाची लागेल लत.
संपादकीय.- संभाजी जाधव.
ऑनलाइन रमी या बेकायदेशीर जुगाराच्या खेळावर आजकाल मोठमोठे कलाकार देखील जाहिरात करत पैसे मिळवत आहेत. व तरुणांना या खेळाची लत लागावी यासाठी जाहिरातीच्या माध्यमातून यातून कसे पैसे मिळवता येतात याची माहिती सोशल मीडियावर मोठ्या दिमाखात जाहिरातीमध्ये प्रसिद्धीसाठी पुढे येत आहेत. या खेळावर शासन बंदी का.? आणत नाही. यामुळे शहरासह ग्रामीण भागातील काही तरुण वर्गाला या खेळाची लत लागलेल्या अवस्थेत आहेत. हातामध्ये मोबाईल घेऊन काही पहात असला तरी एक-दोन मिनिटांमध्ये मधीच जाहिरात येते व यामध्ये कलंकारांसह काही महिला देखील हे ॲप घ्या. व रमी खेळा असा सल्ला देत असतात. शेवटी या खेळावर नियंत्रण कोणाचे असतं याचा प्रमुख कोण आहे. याचा शोध अद्याप कोणाकडे आहे का.? वेगवेगळ्या कलाकाराकडून अपेक्षा नसताना कलाकार देखील जाहिरातीच्या माध्यमातून प्रसिद्धीसाठी पुढे येत आहेत. यामुळे या कलाकारांचा चाहत्याकडून निषेध व्यक्त होत आहे. हे आपण सोशल मीडिया याच्या कमेंट बॉक्स मधून देखील पाहू शकता. पण यांना त्यांचा ठरलेला जाहिरातीचा मोबदला कोण व कशा माध्यमातून देत याकडे शासनाचे दुर्लक्ष झाल्यामुळे अलीकडे हा रमीचा खेळ जगभर फोपावला आहे.
अनेक अशा बेकायदेशीर गोष्टींना शासन लागलीच निर्बंध घालतं मग या खेळा रमी खेळाकडे कोणत्या कायद्याअंतर्गत सोशल मीडियावर खुलेआम बेकायदेशीर जुगार चालवला जात आहे. यामुळे तरुण पिढी या खेळात भरकटली जात आहे. कोणतेही काम न करता खर्चासाठी दिवसभरातून शंभर रुपये मिळतात का याकडे लक्ष केंद्रित करत व्यसनाधीन होत आहेत. याला आळा बसणार का. नाही. अद्याप या खेळावर बंदी आणण्यासाठी जगभरातून कोणती निर्बंध किंवा याबाबतची तक्रार झालेली ऐकायला देखील मिळत नाही. असे काय असावे पण खरोखर जर हा खेळ बेकायदेशीर नसेल म्हणून शासन यावर निर्बंध लावत नसेल का.?
म्हणजे या जाहिरातीमध्ये म्हटलं जातं की “या खेळाची आपल्याला सवयी लागू शकते – जबाबदारीने खेळा” म्हणजे ही कायद्यातील पळवाट झाली का.? उदा. म्हणजे सिगरेटच्या पाकीट वर लिहायचं सिगरेट पिने आरोग्यास हानिकारक आहे. व विकायला देखील परवानगी द्यायची. यापेक्षा सिगरेट बनवण्यासाठी बंदी घातली तर सिगरेटच्या पाटीवर लिहिण्याची गरज भासणार नाही.
किमान असे केल्यानंतर तरी काही लोक व्यसनापासून दूर जातात का पाहावे लागेल म्हणजे हा खेळ नक्कीच बेकायदेशीर खेळातील पळवाटीमुळे हा खेळ कायदेशीर ठरू शकला असं म्हणावे लागेल. परंतु त्या खेळामुळे अनेक बेरोजगार तरुण खेळाच्या सवयीमुळे वेगळ्या वळनावर जात आहेत. याकडे देखील शासनाने उघड्या डोळ्यांनी पाहिले पाहिजेत सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वांचाच मोबाईल मध्ये सदर गेम चे व्हिडिओ येत असतात. यामध्ये सर्व प्रकारचे अधिकारी राजकीय देखील आलेच. मग या खेळावर बंदी आणावी किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून होत असलेला नाहक त्रास थांबला पाहिजे आपण काही मोबाईलवर पाहत असताना अचानक येणारा हा व्हिडिओ व नको असलेले माहिती देत असलेले वेगवेगळे कलाकार आजचा तरुण पिढीला ऑनलाइन बेकायदेशीर जुगार खेळायला भाग पडत असल्याचा आरोप ग्रामीण भागातील नागरिकाकडून होत आहे. आणि सोशल मीडियावर मिळणारी माहिती आपल्याला हवी असेल तीच आपण घेऊ शकतो मग ही नको असलेली माहिती मध्येच येऊन का दिली जाते याबाबत या खेळावर बंदी आणण्यासाठी अनेक तक्रारी नोंद होणे काळाची गरज आहे. अशी मोहीम गावापासून शहरापर्यंत राबवल्याशिवाय या खेळावर बंदी येऊ शकत नाही यासाठी या खेळावर बंदी आणण्यासाठी आवाज उठणे गरजेचे आहे. परंतु हा खेळ न खेळणारे त्यांना नक्कीच या गेमचा त्रास व राग येत असावा. मग प्रश्न असा उपस्थित होतो. जबाबदार शासन यांना देखील होत असावा मग जगभर सोशल मीडियाच्या माध्यमातून राजरोसपणे हा जुगाराचा खेळ ऑनलाइन चालू असताना यांना कोणाचा आशीर्वाद आहे. बरं.
