३० वर्षात प्रथमच एका दिवसात एसटी.- लालपरीची ३० कोटीची केली कमाई.- शेखर चन्ने, व्यवस्थापकीय संचालक, एसटी महामंडळ याची माहिती.
मुंबई.- प्रतिनिधी.

आर्थिक नुकसानीमुळे नेहमीच टिकेचे लक्ष ठरणाऱ्या लालपरीने ऐतिहासिक कामगिरी करून सर्वांचे लक्षवेधले आहे. एका दिवसात एसटी महामंडळाने तब्बल २९.९५ कोटींची कमाई केली आहे.
गेल्या २५ वर्षांच्या इतिहासात पहिल्यादाच दमदार कामगिरी केल्याची माहिती एसटी महामंडळाने दिली आहेत.
आधी कोरोना महामारी आणि त्यानंतर सुरू झालेल्या एसटी कामगारांच्या आंदोलनामुळे एसटी पुर्णपणे ठप्प झाली होती. त्यामुळे एसटीचे प्रवासी खासगी वाहतूकीकडे वळले होते. परिणामी एसटी महामंडळाचा संचित तोटा साडे बारा हजार कोटीच्या घरात पोहचला आहे. यातून एसटीला उभारी मिळणार का असा प्रश्न होता.
महाराष्ट्र शासनाने घेतलेल्या दोन क्रांतिकारी निर्णयामुळे आणि एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चैन यांच्या कार्य कुशलतेमुळे एसटीची प्रवासी संख्या एवढ्या कमी वेळेमध्ये विक्रमी संख्येने वाढलेली आहे. २०२२ च्या जानेवारी महिन्यामध्ये दररोज सरासरी फक्त ३ लाख प्रवाशांची ने-आण करणारी एसटी आता तब्बल ५७ लाख प्रवाशांची दररोज सुरक्षित ने-आण करीत आहे. –
शंभर टक्के भारमान –
गावखेड्यापर्यंत धावणारी एसटी कोरोना महामारीच्या आधी दररोज १८ हजार बससेच्या माध्यमातून ६६ लाख प्रवाशांची वाहतूक करत होती. त्यावेळी सरासरी २३ कोटी रुपयांचे महसूल मिळत होते. परंतु, आता उन्हाळी सुट्ट्यामुळे एसटी महामंडळातील १६ हजार ६०० बसेसपैकी १४ हजार बसेस रस्त्यावर धावत आहे.
यातून दररोज तब्बल ५७ लाख प्रवासी प्रवास करत आहेत. आता तर, अकोला, बुलढाणा आणि यवतमाळ या विभागात शंभर टक्के भारमान आहे.त्यामुळे उत्पन्नात भरगोस वाढ झाली आहे. ८ मे रोजी २९ कोटींहून अधिक उत्पन्न मिळाले आहे.
एसटीवर लोकांनी विश्वास दाखवला आहे. त्याच बरोबर सर्वसामान्य प्रवाशांनी एसटी महामंडळावर चांगला विश्वास दाखवत आहे. याशिवाय एसटी कर्मचारी आणि डेपो मॅनेजर यांनी उन्हाळी सुट्टी आणि लग्नसराई काळात सर्व क्षमतेने बसेस रस्त्यावर उतरविल्याने हे यश मिळाले आहे.
- शेखर चन्ने, व्यवस्थापकीय संचालक, एसटी महामंडळ
एसटीने तीस वर्षात पहिल्यांदा विक्रमी उत्पन्न मिळविले आहे. ही आनंदाची बाब आहे. आर्थिक विवंचनेत असलेली एसटी उभारी घेईल असा विश्वास वाटत आहे. सर्व कर्मचारी व व्यवस्थापन या दोघांचेही अभिनंदन!
- श्रीरंग बरगे, सरचिटणीस, महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेस
दैनंदिन प्रवासी
सर्वसाधारण – ३७ लाख

महिला – १७ लाख
ज्येष्ठ नागरिक – ३ लाख
२०२२ उत्पन्न प्रवासी संख्या
उत्पन्न महिना————–उत्पन्न —- दिवसाची प्रवासी संख्या-
जानेवारी ———–१.०३ कोटी ——— ३. ३३ लाख
फेब्रुवारी ———-२.१. कोटी ——— ७. ७१ लाख
मार्च ———३.४७ कोटी ———११.२१ लाख
एप्रिल ———५.८ कोटी ———१९. ३३ लाख
मे———-९.४३ कोटी ———३०. ४४ लाख
जून———१०.८ कोटी ———३३.६२ लाख
जुलै ——–११.६१. कोटी ———-३७.४७ लाख
ऑगस्ट ———१३.६२ कोटी ————-४३. ९५ लाख
सप्टेंबर——-१५.६२ कोटी ————– ५२. ०७ लाख
ऑक्टोबर——१४. ४६ कोटी ———– ४६. ६७
नोव्हेंबर———१५. ८५ कोटी —————५२.८४ लाख
डिसेंबर———१६. ३२ कोटी ———५२.६५ लाख
