Homeकोंकण - ठाणेपुर्व मध्य अरबी समुद्रात वादळ सदृश्यस्थिती. लक्षद्विप, केरळ, तामिळनाडू व कर्नाटक समुद्र...

पुर्व मध्य अरबी समुद्रात वादळ सदृश्यस्थिती. लक्षद्विप, केरळ, तामिळनाडू व कर्नाटक समुद्र किनाऱ्यावर पर्जन्यमान होण्याची शक्यता.

पुर्व मध्य अरबी समुद्रात वादळ सदृश्यस्थिती. लक्षद्विप, केरळ, तामिळनाडू व कर्नाटक समुद्र किनाऱ्यावर पर्जन्यमान होण्याची शक्यता

रत्नागिरी – प्रतिनिधी.

भारतीय हवामान विभाग यांनी दिलेल्या सूचनेनुसार पुर्व-मध्य अरबी समुद्रात वादळसदृश्य स्थिती निर्माण होत आहे.
14 मे ते 16 मे 2021 या कालावधीत लक्षद्विप, केरळ, तामिळनाडू व कर्नाटक समुद्र किनाऱ्यावर पर्जन्यमान होण्याची शक्यता वर्तविण्‍यात आलेली आहे.तसेच 16 मे 2021 रोजी महाराष्ट्र -गोवा किनाऱ्यावर 40-45 ते 60 किमी प्रतीतास वेगाने वारे वाहण्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे व या कालावधीत समुद्र खवळलेला राहणार आहे.
तरी सर्व मच्छीमार व समुद्र किनाऱ्यावरील गावे यांना सावधनतेचा इशारा देण्यात येत असून 15 मे व 16 मे 2021 या कालावधीत संबधितांना समुद्रात जाऊ नये असे निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, रत्नागिरी यांनी आवाहन केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.