आजरा मडिलगेत भावेश्वरी देवीची भव्य यात्रा. – १२ वर्षानंतर होणारी यात्रेची दि. २४ रोजी झाली सुरुवात.
आजरा.- प्रतिनिधी.

मडिलगे ता.आजरा येथील ग्रामदैवत भावेश्वरी देवीची भव्य यात्रा दि.२४, २५, २६ रोजी १२ वर्षानंतर होत आहे. या भव्य यात्रेनिमित्त ग्रामस्थांची यात्रेसाठी विविध करमणूक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. यात्रेला सुरुवात होण्यापूर्वी ग्रामस्थ सुरजन पाटील, संभाजी जाधव (पत्रकार), संदेश पाटील, अनिल भोगले, व पुंडलिक घाटगे सहकारी मित्र यांनी आयोजन केलेल्या भव्य ओपन मेंढ्याच्या स्पर्धा संपन्न झाल्या या स्पर्धेसाठी बक्षीसदाते व देणगीदार ग्रामस्थ यांचे सहकार्य लाभले असून दि. २५ रोजी रात्री ११ वा. जागराचा कार्यक्रमासाठी आम्ही मराठी या आर्केस्ट्राचे आयोजन करण्यात आले आहे. दि २४ रोजी. सासनकाठी खेळवणे कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. तसेच अंबील खुगर्या नैवेद्य करण्यात आला.
गावचे आराध्य दैवत व ग्रामदैवत आई भावेश्वरी देवी म्हणजे साक्षात एक जागृत देवी आहे. भक्तीमय वातावरणामध्ये ही यात्रा संपन्न होणार आहे. यासाठी देवस्थान समिती व यात्रा समिती यांच्या वतीने परफेक्ट असं नियोजन चालू आहे. यासाठी यात्रे दिवशी पार्किंग व्यवस्था गावाच्या बाहेर आहे. यासाठी पार्किंग व्यवस्था, तसेच गावातील नागरिकांना सुरळीत पाणीपुरवठा व्हावा., गाव स्वच्छ व सुंदर दिसावं यासाठी ग्रामपंचायत कडून रस्ते गटर गावातील सभोवती या पूर्वीपासून प्रलंबित असलेला नेहमीच्या दळणवळणासाठी रिंग रोड लाईट व्यवस्था अशी कोणत्याही प्रकारची ऐनवेळी अडचण येऊ नये यासाठी ग्रामपंचायत स्तरावर नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच, सदस्य चांगल्या पद्धतीने काम करत आहेत. यासाठी गावातील गावातील ज्येष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वच समित्या यात्रा चांगल्या पद्धतीने व शांततेत पार पाडण्यासाठी कायदा व सुव्यवस्था पाळत जबाबदारीने यात्रा पार पाडण्यासाठी काम करत आहेत. तसेच यात्रा शांततेत पार पाडण्यासाठी गावातील सर्वच नागरिक डोळ्यासमोर चांगली भूमिका ठेवून एकमेकांना सहकार्य करत आहेत. त्याचबरोबर डिजिटल फलकामुळे अडचण येऊ नये व विनाकारण डिजिटल वर खर्च होऊ नये यासाठी ग्रामपंचायत स्तरावर डिजिटल मुक्त व प्रदूषण मुक्त यात्रा करण्याचे नियोजन ग्रामपंचायतचे आहे.
भावेश्वरी देवीच्या यात्रे निमित्ताने.- देवस्थान समिती यात्रा समिती व ग्रामपंचायत यांच्या वतीने विशेष सूचना व माहिती देण्यात आली आहे. यात्रेच्या अगोदर २ दिवस पाणी साठवनुक करावे, पाणी झाकून ठेवा व काटकसरीने वापर करावा.
तसेच रस्ता अथवा सार्वजनिक ठिकाणी टू व्हिलर ,फोर व्हीलर पार्किंग करू नका. सार्वजनिक ठिकाणी अथवा रस्ता वर मंडप बैठक व्यवस्था करु नये, आपल्या घरातील टू व्हीलर व फोर व्हीलर वाहने योग्य ठिकाणी पार्किंग करावी व यात्रेनिमित्त येणाऱ्या सर्व नातेवाईक पाहुण्यांची टू व्हीलर व फोर व्हीलर पार्किंगची व्यवस्था गावाबाहेर असल्याच्या सूचना आपापल्या पाहुणे नातेवाईकांना देऊन सर्वांनी विशेष सहकार्य करायचे आहे. व यात्रा सर्वांच्या सहकार्याने शांततेत पार पाडायची आहे असे आवाहन सरपंच बापू निऊगरे, उपसरपंच सुशांत गुरव सर्व ग्रामपंचायत सदस्य देवस्थान समिती अध्यक्ष विश्वजीत मुंज सर्व समिती सदस्य यात्रा कमिटी अध्यक्ष प्रकाश कडगावकर सर्व समिती सदस्य यांनी केले आहे.

