Homeमुंबईकर्नाटकात भाजपच्या युवा नेत्याची हत्या

कर्नाटकात भाजपच्या युवा नेत्याची हत्या

कर्नाटकात भाजपच्या युवा नेत्याची हत्या

बंगळुरू – वृत्तसंस्था

कर्नाटकच्या धारवाड येथे भारतीय जनता पार्टीच्या युवा शाखेच्या एका पदाधिकाऱ्याचे चाकूने भोसकून हत्या करण्यात आली आहे. प्रविण कुमार असे त्याचे नाव असून या घटनेनंतर तेथील वातावरण प्रचंड तापले आहे. हुबळी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार काल रात्री हत्या करण्यात आली असून तीन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे व आता त्यांची चौकशी केली जाते आहे.

कोट्टूर गावात देवी उदाचम्मा मंदिराच्या उत्सवाच्या काळात ही हत्या करण्यात आली आहे. काही लोक तेथे अचानक अमली पदार्थ घेतलेल्या अवस्थेत आले. स्थानिकांनी त्यांना रोखले असता दोन गटात हाणामारी झाली. त्यात प्रविण कुमार यांची हत्या करण्यात आली. पोलीस आता या प्रकरणाचा तपास करत असून कोणालाही सोडले जाणार नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.