पारंपारिक चालीरीतीने साजरी होणार मडिलगेत भव्य यात्रा. – १२ वर्षानंतर होणारी यात्रेची उत्सुकता पणाला. ( डिजिटल व प्रदूषण मुक्त यात्रा करण्याचे ग्रामपंचायतीचे नियोजन. )
आजरा.- यत्रा विशेष.

कोल्हापूर जिल्ह्यातील व आजरा तालुक्यातील मडिलगे येथील ग्रामदैवत भावेश्वरी देवीची भव्य यात्रा दि.२४, २५, २६/ २०२३ रोजी बारा वर्षानंतर होत आहे. या भव्य यात्रेनिमित्त ग्रामस्थांची यात्रेच्या निमित्ताची कामाची लगबग अत्यंत चुरशीने चालू आहे. घराची स्वच्छता, रंगरंगोटी तसेच यात्रेनिमित्त लागणाऱ्या पाहुण्यांच्या व्यवस्थेसाठी परिपूर्ण तयारी जोरात चालू आहे. गावचे आराध्य दैवत व ग्रामदैवत आई भावेश्वरी देवी म्हणजे साक्षात एक जागृत देवी आहे. भक्तीमय वातावरणामध्ये ही यात्रा संपन्न होणार आहे. यासाठी देवस्थान समिती व यात्रा समिती यांच्या वतीने परफेक्ट असं नियोजन चालू आहे. यासाठी यात्रे दिवशी पार्किंग व्यवस्था गावाच्या बाहेर आहे. यासाठी पार्किंग व्यवस्था, तसेच गावातील नागरिकांना सुरळीत पाणीपुरवठा व्हावा., गाव स्वच्छ व सुंदर दिसावं यासाठी ग्रामपंचायत कडून रस्ते गटर गावातील सभोवती या पूर्वीपासून प्रलंबित असलेला नेहमीच्या दळणवळणासाठी रिंग रोड लाईट व्यवस्था अशी कोणत्याही प्रकारची ऐनवेळी अडचण येऊ नये यासाठी ग्रामपंचायत स्तरावर नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच, सदस्य चांगल्या पद्धतीने काम करत आहेत. यासाठी गावातील गावातील ज्येष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वच समित्या यात्रा चांगल्या पद्धतीने व शांततेत पार पाडण्यासाठी कायदा व सुव्यवस्था पाळत जबाबदारीने यात्रा पार पाडण्यासाठी काम करत आहेत. तसेच यात्रा शांततेत पार पाडण्यासाठी गावातील सर्वच नागरिक डोळ्यासमोर चांगली भूमिका ठेवून एकमेकांना सहकार्य करत आहेत. त्याचबरोबर डिजिटल फलकामुळे अडचण येऊ नये व विनाकारण डिजिटल वर खर्च होऊ नये यासाठी ग्रामपंचायत स्तरावर डिजिटल मुक्त व प्रदूषण मुक्त यात्रा करण्याचे नियोजन ग्रामपंचायतचे आहे.
भावेश्वरी देवीच्या यात्रे निमित्ताने.- देवस्थान समिती यात्रा समिती व ग्रामपंचायत यांच्या वतीने विशेष सूचना व माहिती देण्यात आली आहे की.
यात्रेच्या अगोदर २ दिवस पाणी साठवनुक करावे, पाणी झाकून ठेवा व काटकसरीने वापर करावा. तसेच
सोमवार दि.२४ रोजी अंबील खुगर्या नैवद्य शंकरलिग मंदिरामध्ये सायंकाळी ७ पर्यंत जमा करावा.
दंडवत घालणे.- क्रार्यक्रम मंगळवारी सकाळी ८ ते १० या वेळेत होईल. तसेच रस्ता अथवा सार्वजनिक ठिकाणी टू व्हिलर ,फोर व्हीलर पार्किंग करू नका. सार्वजनिक ठिकाणी अथवा रस्ता वर मंडप बैठक व्यवस्था करु नये, आपल्या घरातील टू व्हीलर व फोर व्हीलर वाहने योग्य ठिकाणी पार्किंग करावी व यात्रेनिमित्त येणाऱ्या सर्व नातेवाईक पाहुण्यांची टू व्हीलर व फोर व्हीलर पार्किंगची व्यवस्था गावाबाहेर असल्याच्या सूचना आपापल्या पाहुणे नातेवाईकांना देऊन सर्वांनी विशेष सहकार्य करायचे आहे. व यात्रा सर्वांच्या सहकार्याने शांततेत पार पाडायची आहे असे आवाहन सरपंच बापू निऊगरे, उपसरपंच सुशांत गुरव सर्व ग्रामपंचायत सदस्य देवस्थान समिती अध्यक्ष विश्वजीत मुंज सर्व समिती सदस्य यात्रा कमिटी अध्यक्ष प्रकाश कडगावकर सर्व समिती सदस्य यांनी केले आहे.
【 मागील यात्रा ९/५/२०११ ते ११/५/२०११ साली झाली होती. सद्या होत असलेली भव्य यात्रा २४/४/२०२३ ते २६/४/२०२३ या सालातील कालावधीत होत आहे. यानंतर होणाऱ्या यात्रा सालाबादप्रमाणे होणार असल्याने ही यात्रा भव्य दिव्य अशी होणार यामुळे ग्रामपंचायत देवस्थान समिती व यात्रा समिती यांनी चांगल्या पद्धतीचे नियोजन केले आहे 】
