⭕डी.एड. अभ्यासक्रमाला प्रवेश घ्यायचा की नाही?
⭕ नवीन शैक्षणिक धोरणामुळे विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये संभ्रमावस्था……..
पुणे = प्रतिनिधी.
नवीनशैक्षणिक धोरणाची पहिल्या टप्प्यातील अंमलबजाकणी येत्या नवीनशैक्षणिक वर्षात होणार आहे.
त्यामध्ये बी.एड.साठी शिक्षणशास्त्र विषयाचा 4 र्षीय अभ्यासक्रम सुरू होणार आहे. बारावीनंतरच हा अभ्यास असून, त्याच्या अंमलबजावणीसाठी चाचपणी सुरू झाली आहे. त्यामुळे डी.एड. कोर्स बंद होणार अशी चर्चा सत्र सुरू आहे.
मात्र, डी.एड. अभ्यासक्रमाबाबत काहीच स्पष्टता नसल्याने डी.एड. महाविद्यालयेही याबाबत अनभिज्ञच आहेत.
बारावीचा निकाल जवळ आल्याने किद्यार्थी-पालकांमध्ये डी.एड. प्रवेशप्रक्रियेबाबत संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.
बारावी बोर्ड परीक्षेचा निकाल मे महिन्याच्या शेवटच्या आठवडय़ात लागणार असल्याचे परीक्षा मंडळाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे विद्यार्थी व पालकांची पुढील शैक्षणिक करीअरच्या दृष्टीने तयारी सुरू झाली आहे. बारावीनंतरचे व्यावसायिक अभ्यासक्रम,
त्यांच्या प्रवेशप्रक्रिया,
नोकरीच्या संधी याची चाचपणी केली जात आहे.
अशातच नवीनवर्षात नवीनराष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी होणार असून, चार वर्षांचा पदवी अभ्यासक्रम सुरू होणार आहे.
शिक्षक म्हणून करिअर करणाऱ्यांसाठी सध्याचा दोन वर्षांचा बी.एड
अभ्यासक्रमांऐवजी पदवीलाच शिक्षणशास्त्र विषयातून 4 वर्षांचा बी.एड. अभ्यासक्रम सुरू होणार आहे.
नवीनधोरणानुसार 5-3-3-4 हा शैक्षणिक फॉर्म्युला कापरला जाणार असल्याने डी.एड. कॉलेजेस बंद होणार अशी चर्चा सुरू आहे.
बारावीनंतर घेतल्या जाणाऱया डी.एड. अभ्यासक्रमाबाबत स्पष्टता केलेली नाही.
डी.एड. महाविद्यालयांना शिक्षण संचालनालयाकडून कोणताच पत्रव्यवहार नाही.
त्यामुळे हा अभ्यासक्रम सुरू राहणार का?
नवीनप्रवेशप्रक्रिया कशी,
याबाबत डी.एड. महाविद्यालये, विद्यार्थी व पालकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
नवीनशैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी पहिलीच्या वर्गापासून होणार आहे.
ही मुले बारावी उत्तीर्ण होईपर्यंत बराच कालावधी जाणार आहे. येत्या शैक्षणिक वर्षातील डी.एड. प्रवेश व अभ्यासक्रम नियोजनावर परिणाम होणार नाही.
भविष्यात काही बदल झाला तर तो संस्थात्मक होईल.
त्यामुळे पालक व विद्यार्थ्यांनी निश्चित होऊन प्रवेश प्रक्रियेमध्ये सहभागी व्हावे,
असे प्राचार्य डॉ. विकास सलगर यांनी सांगितले.
⭕डी.एड. पदविकाधारकांचा जीव टांगणीला
डी.एड. पदकीधारकांना प्राथमिक शाळेवर शिक्षक म्हणून नोकरीची संधी मिळते.
परंतु गेल्या काही वर्षांत शासनाकडून शिक्षक भरती न झाल्याने अनेक डी.एड.धारक सध्या नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत. शासनाकडून शिक्षक भरती होईल अन् आपल्याला संधी मिळेल या आशेवर ते आहेत. मात्र, आता डी.एड. पदविका अभ्यासक्रमाबाबतच सांशकता निर्माण झाल्याने नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या डी.एड. पदविकाधारकांचा जीव टांगणीला लागला आहे.
