ग्राम विकास मंडळ खेडे – मुंबई मार्फत मोफत महाआरोग्य शिबीर संपन्न. – २८० नागरिकांनी शिबिराचा घेतला लाभ.
आजरा. – प्रतिनिधी.

ग्राम विकास मंडळ खेडे – मुंबई आयोजित मोफत महाआरोग्य शिबीर व संत गजानन महाराज रुरल हॉस्पीटल महागांव व ग्रामविकास मंडळ खेडे – मुंबई यांच्या संयुक्त विद्यमानाने दि १५ रोजी खेडे येथील अखंड हरिनाम सप्ताह या सपत्याचे अवचित साधून ग्रामीण भागातील गोर-गरीब जनतेला आरोग्याची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उदात्त हेतूने वेगवेगळ्या आजारावर मोफत उपचार केले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी आजरा अर्बन चे चेअरमन डॉ. अनिल देशपांडे होते. स्वागत व प्रास्ताविक बबन अर्दाळकर यांनी केले. मुंबई ग्रामस्थांकडून सलग दुसऱ्या वर्षी या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे या शिबिराला नागरिकांच्याकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे व या मुंबई ग्रामस्थांचे या शिबिरामागे योगदान असल्याचे यावेळी डॉ.श्री देशपांडे यांनी बोलताना सांगितले खेडे – मुंगूसवाडी ग्रामस्थ व परिसरातील २८० नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला. यावेळी सर्व नूतन ग्रामपंचायतचे सरपंच नवनिर्वाचित सदस्य यांचा सत्कार करण्यात आला.
या शिबिराला लोकनियुक्त सरपंच डॉ. संदीप देशपांडे, ग्राम विकास मंडळ खेडे – मुंबई अध्यक्ष दयानंद पालकर, उपाध्यक्ष. दयानंद मोरबळे, सेक्रेटरी शिवाजी सावरतकर, खजिनदार रवी पालकर, तसेच आशिष सावरतकर दीपक पाटील महादेव अर्दाळकर, सुनिल पाटील, अभिजित ढापळे, सह खेडे मुंगुसवाडी ग्रामपंचायतचे सर्व नवनिर्वाचित, माजी सदस्य ग्रामस्थ ज्येष्ठ नागरिक महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्थानिक नागरिकांचे सहकारी लाभले. आभार अध्यक्ष पालकर यांनी मानले.

