Homeनाशिक - उ. महाराष्ट्रपाच जागा द्या.- अन्यथा निवडणुकीला सामोरे जावे.- चराटी शिंपी गट.- आजरा तालुका...

पाच जागा द्या.- अन्यथा निवडणुकीला सामोरे जावे.- चराटी शिंपी गट.- आजरा तालुका खरेदी विक्री संघ पंचवार्षिक निवडणूक रणधुमाळी.

पाच जागा द्या.- अन्यथा निवडणुकीला सामोरे जावे.- चराटी शिंपी गट.- आजरा तालुका खरेदी विक्री संघ पंचवार्षिक निवडणूक.

आजरा.- प्रतिनिधी.

आजरा तालुका खरेदी विक्री संघाची पंचवार्षिक निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे निवडणूक होणार अशी चर्चा असताना जागा वाटपामध्ये शिंपी व चराटी गटाला पाच जागेचा प्रस्ताव दिलेला आहे परंतु याबाबत विद्यमान संघ चालक यांची मानसिकता नसण्याचे निदर्शनास येत असल्याने शिंपी व चराटी गटाने पत्रकार परिषदेमध्ये आपली भूमिका सांगितली. यावेळी जि.प.चे माजी उपाध्यक्ष जयवंत शिंपी म्हणाले यापूर्वी आमच्या सहा जागा होत्या परंतु अशोक चराटी प्रस्तावा देताना पाच जागा मागितल्याने शब्दात बदल करणार नाही परंतु जर पाच जागा देण्यासाठी विद्यमान संस्था चालक जर आपली मानसिकता बदलत नसतील तर ही निवडणूक कोणी लावली हे सभासदांच्या लक्षात येईल आम्हाला पाच जागा जर नाही दिल्या तर आम्ही निवडणूकला सामोरे जाऊ मुळात निवडणूक लावून संस्थेला खर्चामध्ये घालणे आम्हाला मान्य नसल्याने सध्याची संघाची परिस्थिती पाहता बिनविरोध होणार गरजेचे आहे मग 19 पैकी पाच जागा दिल्यास बहुमत तर आपल्याकडे राहणार मग पाच जागा देण्यास कोणती अडचण आपल्यासमोर येत आहे. तसेच आम्ही दिलेला प्रस्ताव याबाबतची मानसिकता आपल्याकडे नसेल तर निवडणूक आपणच लावला आहात. हे सिद्ध होईल त्यामुळे आमची आजही भूमिका आहे बिनविरोधी अशीच आहे. दिलेला प्रस्ताव मान्य करून पाच जागा देण्यात यावे व सभासदांच्या व संस्थेच्या हितासाठी आजरा तालुका खरेदी विक्री संघ बिनविरोध व्हावा अशी आमची इच्छा असल्याचे श्री शिंपी यांनी बोलताना म्हणाले. यावेळी अण्णाभाऊ संस्था समूहाचे प्रमुख अशोक चराटी म्हणाले तालुक्यातील सर्व संस्था बिनविरोध व्हाव्या असेल आमच्या दोन्ही गटाची इच्छा आहे परंतु यापूर्वी सहा जागा असताना मी पाच जागेची मागणी केली आहे. परंतु संस्थाचालकाकडे मी सांगतो तेच झाले पाहिजेत ही भूमिका बदलावी कारण ज्यांच्याकडे संघ आहे त्यांची मानसिकता व्हावी असे वाटत नसावे निवडणूक फॉर्म भरून चर्चा करूया असे ठरले असताना अद्याप याबाबतचे उत्तर मिळाले नाही परंतु निवडणूक किती अवघड आहे किंवा सोपी आहे हे माहित नाही. पण काही ठराव हुकूमशाहीच्या मार्गाने बोगस केले आहे. शेअर्स रक्कम कमी असलेल्या सभासदांना मतदानाचा हक्क डावलण्यात येत होता. तो हाणून पडला आहे. व सर्व १० हजार ८०० सभासदांना मतदानाचा हक्क मिळवून दिला आहे. अजूनही संस्था चालकांनी आपली मानसिक ती बदलावी व शिंपी चराटी गटाला पाच जागा देऊन निवडणूक बिनविरोध करावी. कारण संघाची सद्यस्थितीला खत विक्री व गाळे भाडे वगळता कोणतेही उत्पन्नाचे साधन मोठ्या प्रमाणात यापूर्वीपासून निर्माण केलेले नसल्याने तोट्यात असलेला संघाची निवडणूक लावणे म्हणजे संस्था डबघाईला जाईल त्यापेक्षा तालुक्यातील ही संस्था नावारूपाला आली पाहिजे अशी आमची मानसिकता आहे. निवडणूक बिनविरोध करा व कामगारांचे पगार वाढवा व यासाठी आमची कोणती हरकत नाही. यामुळे पाच जागा द्या अन्यथा निवडणुकीला सामोरे जावे असे यावेळी श्री चराटी यांनी बोलताना म्हणाले. यावेळी मुकुंद तानवडे, दशरथ अमृते, डॉ इंद्रजीत देसाई, एस. पी कांबळे, विलास पाटील, दत्ता पाटील, राजाराम पोतणीस, विश्वास जाधव, सचिन शिंपी, पांडुरंग लोंढे, तसेच चराटी व शिंपी गटाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. स्वागत अभिषेक शिंपी यांनी केले तर आभार अनिकेत चराटी यांनी मानले. [ आजरा साखर कारखान्याची परिस्थिती फारच बिकट असल्याने या साखर कारखान्याची निवडणूक देखील बिनविरोध व्हावी अशीच आमच्या दोन्ही गटाची मानसिकता असल्याचे देखील यावेळी सांगण्यात आले. ]

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.