Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्रजिल्हयातील लोकप्रतिनिधी,सर्व शासकीय अधिकारी यांची खरीप हंगामपूर्व आढावा बैठक संपन्न.

जिल्हयातील लोकप्रतिनिधी,सर्व शासकीय अधिकारी यांची खरीप हंगामपूर्व आढावा बैठक संपन्न.

जिल्हयातील लोकप्रतिनिधी,सर्व शासकीय अधिकारी यांची खरीप हंगामपूर्व आढावा बैठक संपन्न. झाली.

कोल्हापूर. प्रतिनिधी.दि.११

कोल्हापूर जिल्हास्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठक जिल्ह्यातील
सर्व लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी यांच्यासोबत आयोजित करण्यात आली होती. यावेळी, जिल्ह्यातील खरीप हंगामाबद्दची तयारी व नियोजनाबाबत सविस्तर माहिती घेत संबंधिताना योग्य सूचना करण्यात आल्या आहेत.
यावेळी पर्जन्यमान,उत्पादन, खते व बियाणे,खरीपकरिता बियाणे मागणी व गरज, खरीप हंगामासाठी खतांचा पुरवठा,दर्जेदार खते व बियाणे‍ मिळण्याकरिता गुणवत्ता नियंत्रण, मृदा आरोग्य पत्रिका, पीक कर्ज वाटप, पीक विमा योजना, हुमणी किड व्यवस्थापन,काजू पीक संरक्षण आदींबाबत सविस्तर माहिती घेतली.
पणन मंडळामार्फत नाचणी खरेदीची प्रक्रिया करण्याबाबतचा प्रस्ताव तयार करुन शासनाला पाठवावा. जेणेकरुन त्याचा शेतकऱ्यांना फायदा हाईल. त्याचबरोबर खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांची खते, बियाणांबाबत लिंकिंग होणार नाही याबाबत कृषी विभागाने आतापासूनच दक्षता घ्यावी.
याचसोबत, बैठकीमध्ये लोकप्रतिनिधींनी केलेल्या सूचनांची नोंद घेवून त्या प्रमाणे कार्यवाही करावी व खते, बियाणे, युरिया वेळेवर मिळण्याबाबत नियोजन ठेवणे आदींबाबत संबंधितांना सूचना देण्यात आल्या आहेत.
यावेळी, आमदार अरुण लाड, आमदार राजेश पाटील, आमदार प्रकाश आबिटकर, आमदार ऋतुराज पाटील, जिल्हाधिकारी दौलत देसाई, पालकमंत्री सतेज पाटील , जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बजरंग पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, उपाध्यक्ष सतीश पाटील, कृषी सहसंचालक उमेश पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानदेव वाकुरे, कृषी विकास अधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, उपसंचालक भाग्यश्री पवार उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.