Homeमुंबईपॅनकार्ड-आधार कार्डशी लिंकचा नागरिकांना आर्थिक भुर्दंड!..🔴 पूर्वीप्रमाणे मोफत लिंक करण्याची सुविधा उपलब्ध...

पॅनकार्ड-आधार कार्डशी लिंकचा नागरिकांना आर्थिक भुर्दंड!..🔴 पूर्वीप्रमाणे मोफत लिंक करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी.अशी मागणी जिल्ह्यातील नागरिकांकडून होत आहे.

पॅनकार्ड-आधार कार्डशी लिंकचा नागरिकांना आर्थिक भुर्दंड!..
🔴 पूर्वीप्रमाणे मोफत लिंक करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी.अशी मागणी जिल्ह्यातील नागरिकांकडून होत आहे.

कोल्हापूर.- प्रतिनिधी.

आधार कार्डला पॅनकार्ड लिंक करण्यासाठी १ हजार रुपये शासकीय फी आकारली जात आहे.परंतु, सायबर कॅफेमधून नागरिकांची लूट होत असून अतिरिक्त दोनशे ते पाचशे रुपये असे एक हजार ५०० रुपयांपर्यंत आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.
🔴सरकारने आधार कार्डला पॅनकार्ड लिंक करण्याची सक्ती केली आहे. लिंक करण्यासाठी जूनपर्यंत मुदतवाढ असली तरी संबंधित साइटवर शासकीय फी नागरिकांना भरावीच लागत असल्याची स्थिती आहे. आधारशी पॅनकार्ड लिंक करण्यासाठी नागरिकांनी सायबरमध्ये गर्दी केली आहे.
🟥पूर्वी पॅनकार्ड आधारशी लिंक करण्यासाठी कुठलेही दर आकारले जात नव्हते. सध्या लिंक करण्यासाठी शासकीय फी एक हजार रुपये असून सायबर कॅफे चालक त्यांच्या कामाचा मोबदला म्हणून २०० ते ५०० रुपये आकारणी करत आहे.या अतिरिक्त रकमेमुळे नागरिकांची अडचण होत आहे. बहुतांशी नागरिकांना लिंक करण्याबाबत माहिती नाही. ग्रामीण भागातील नागरिकांचा यात समावेश आहे. शहरातीलही असे बहुसंख्य नागरिक आहेत, त्यांना पॅनकार्ड आधारशी लिंक करता येत नाही.त्यामुळे त्यांचे पॅन कार्ड आधारशी लिंक करणे अद्यापही बाकी आहे. अनेक नागरिकांना 1 हजार रूपये देणे अशक्य आहे. या व्यतिरिक्त सायबर कॅफे चालकांकडून लिंक करून देण्याचे वेगळे पैसे घेतले जात असल्याने त्याची अतिरिक्त झळ नागरिकांच्या खिशाला बसत आहे
.

🔴-पॅनकार्ड लिंकला मुदतवाढ दिली असताना १ हजार शासकीय फी माफ करण्यात यावी. पूर्वीप्रमाणे मोफत लिंक करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी.अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.तर काही सामाजिक संघटनांनी तसेच विविध पक्षाच्या नेत्यांनी याचा विरोध करायला हवा. जिल्ह्यातील शहरा सह ग्रामीण भागातील नागरिकांची मागणी पुढे येत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.