आजरा हाळोली डोंगरावर वसलेला चाळोबा हे तीर्थक्षेत्र “क” वर्ग पर्यटन स्थळात नमूद.- आम. प्रकाश आबिटकर यांचे यशस्वी प्रयत्न
आजरा.- प्रतिनिधी.

आजरा तालुक्यातील ८४ खेड्यांचे श्रद्धास्थान असलेले सह्याद्रीच्या पर्वतरांगापैकी हाळोली गावातील डोंगरावर वसलेला चाळोबा हे तीर्थक्षेत्र क वर्ग पर्यटन स्थळात नमूद करून या तीर्थक्षेत्रासाठी हाळोली गावातील श्री चाळोबा ग्रुप च्या कार्यकर्त्यांनी श्रमदानातून केलेल्या कामाची दखल घेऊन व ग्रुप ग्रामपंचायत हाळोली ,दर्डेवाडी ,मेढेवाडी यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे आजरा राधानगरी मतदारसंघाचे कार्यसम्राट आम. प्रकाश आबिटकर यांच्या अथक प्रयत्नातून महाराष्ट्र शासनाकडून चाळोबा तीर्थक्षेत्र सुशोभीकरण व पायाभूत सुविधा कामासाठी १ कोटी ७५ लाख इतका भरघोस निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आजरा तालुक्यातील ग्रामस्थ व हाळोलीकर ग्रामस्थ मंडळ तसेच चाळोबा ग्रुप हाळोली आम. श्री. आबिटकरसो यांचे हार्दिक हार्दिक आभार मानले जात आहेत. तसेच रस्त्यावरील चाळोबाच्या सुशोभीकरणाकरिता आपल्या मतदारसंघाचे खास. संजय मंडलिक यांना ग्रामपंचायत सदस्यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे सुशोभीकरणाकरिता २० लाख रुपये मंजूर केले याबद्दल माननीय खास. श्री. म॑डलीक देखील आजरा तालुक्याच्या वतीने आभार व्यक्त केले जात आहेत क वर्ग दर्जा मिळाल्याने तालुक्यातील नागरिकांच्या वतीने कौतुक होत आहे.
