श्रमिक मुक्ती दलाच्या नेतृत्वाखाली निघणार.- २७ रोजी – कष्टकरी जनतेचा मोर्चा.
आजरा.- प्रतिनिधी.
आजरा येथील श्रमिक मुक्ती दल यांचा सोमवार दि २७ मार्च २०२३ रोजी आजरा तहसील कार्यालयावर श्रमिक मुक्ती दलाच्या नेतृत्वाखाली निघणारा कष्टकरी जनतेचा मोर्चा निघणार असल्याचे निवेदन आजरा पोलीस स्टेशन यांना निवेदन दिले आहे. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. की महाराष्ट्र शासनाने काढलेल्या अन्यायी शासन निर्णयाच्या विरोधात सातारा जिल्ह्यात कोयना धरण व बामनोली तर कोल्हापूर जिलधिकारी कार्यालय येथे धरणग्रस्तांचे बेमुदत ठिय्या आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाबाबत सरकार अजून गंभीर दिसत नाही. म्हणून आम्ही आजरा तालुक्यातील अपंग, विधवा परीतकत्या आणि धरणग्रस्त स्त्री पुरुष आजरा तहसील कार्यालयावर मोर्चाने येऊन निवेदन देणार आहोत. राज्य सरकारने याबाबत तात्काळ भूमिका घेऊन धरणग्रस्त प्रतिनिधी सोबत बैठक न घेतंल्यास आम्ही हीं या आंदोलनात सहभागी होऊ हे संगण्यासाठी हा मोर्चा निघणार आहे. याबाबतची निवेदन कॉम्रेड संपत देसाई, दशरथ घुरे, नारायण भडांगे यांनी माहिती दिली.
