Homeकोंकण - ठाणेसाऊ श्रमिक महिला समुपदेशन संस्थेचा.- महिला दिनानिमित्त व्यवसाय प्रोत्साहन मार्गदर्शन मेळावा संपन्न.

साऊ श्रमिक महिला समुपदेशन संस्थेचा.- महिला दिनानिमित्त व्यवसाय प्रोत्साहन मार्गदर्शन मेळावा संपन्न.

साऊ श्रमिक महिला समुपदेशन संस्थेचा.- महिला दिनानिमित्त व्यवसाय प्रोत्साहन मार्गदर्शन मेळावा संपन्न.

आजरा.- प्रतिनिधी.

साऊ श्रमिक महिला समुपदेशक संस्था आजरा यांच्या वतीने दि.१२ मार्च २०२३ रोजी आजरा येथील मॉर्निंग स्टार येथील सभागृहात ८ मार्च जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिला मेळावा संपन्न झाला.
कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योत सावित्रीबाई फुले, राजमाता जिजाऊ मासाहेब, तसेच संविधान यांचे फोटो पूजन बेबी नसरदी यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी सभापती रचना होलम होत्या. प्रास्ताविक पद्मिनी पिळणकर यांनी केले यावेळी अध्यक्ष स्थानावरून बोलताना सौ.होलम म्हणाल्या स्त्रियांची आरोग्य विषयी काळजी घेणे गरजेचे आहे. तालुक्यात बचत गट कार्यरत आहेत. या माध्यमातून गावोगावी व्यवसायिक दृष्ट्या चांगल्या पद्धतीचे काम चालू आहे. परंतु इतर महिलांनी पुढे येऊन स्वावलंबी होणे करता व्यवसाय सुरू केले. पाहिजेत विधवा प्रता व विधवांना माणसांना मिळावा यासाठी महिलांनीच पुढाकार घेणे गरजेचे आहे मुलींचे प्रमाण वाढले पाहिजेत जन्मदर वाढविण्यासाठी कुटुंबामध्ये विचारांचे परिवर्तन होणे गरजेचे असल्याचे यावेळी सौ.होलम यांनी बोलताना
यावेळी बोलताना कार्यक्रमाचे वक्ते मंगल खापरे यांनी समाजातील महिलांचे स्थान त्यांचे आरोग्य व महिला सशक्तीकडे होणारी वाटचाल यावर मार्गदर्शन केले यावेळी प्रसाद पिळणकर यांनी बचत गटातील व्यवसाय संधी सेंद्रिय शेती शेती पूरक व्यवसाय शासकीय योजना व उपलब्ध मार्केटमधील संधी यावर माहिती सांगितली व्ही.सी. शिवानंद तिरुमला तिरुपती को-ऑपरेटिव्ह सोसायटी बँक यांनी बँकेची माहिती व व्यवसाय उपलब्ध संधी याविषयी मार्गदर्शन केले प्राथमिक उपकेंद्र वाटंगी येथील प्रशांत आव्हाड यांनी महिलांचे आरोग्य संदर्भात गंभीर समस्या व यासाठी सहकारी सेवा योजना त्यांची सविस्तर माहिती देऊन महिलांना आरोग्याची काळजी घ्यावी असा संदेश दिला. यावेळी बचत गटाच्या माध्यमातून बचत गट वर्धिनी म्हणून उत्कृष्ट कामकाज केल्याबद्दल उमा संकपाळ त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी रेखा दोरुगडे, छाया तिप्पट पूनम भादवणकर, शजाद मुल्ला, मिनाज कानडीकर, अझरुद्दीन, खतिजा ढालाईत, भारती कांबळे, एस बी कुंभार, चंदनवाले, विद्या सावरकर, शोभा कांबळे, निकिता, प्रगती कदम, रेशमा पटेल सह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंदाकिनी यांनी केले तर आभार भारती माळी यांनी मानले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.