केंद्रीय उड्डाण मंत्री, भारत सरकार
ना. ज्योतिरादित्य सिंधिया (शिंदे)
यांचा आजरा दौरा.- नव युवा मतदाराशी थेट संवाद साधणार.
आजरा.- प्रतिनिधी.
आजरा येथे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ निवडणूक २०२४ च्या पूर्वतयारीसाठी सोमवार ता.२७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ठीक ४:३० वा. आजरा शहरामध्ये ना. ज्योतिरादित्य सिंधिया (शिंदे) येत असल्याची माहिती भाजप अजरा तालुकाध्यक्ष सुधीर कुंभार यांनी दिली आण्णा भाऊ सांस्कृतिक सभागृह आजरा या ठिकाणी ते नव युवा मतदाराशी थेट संवाद साधणार आहेत. लोकसभा निवडणूक २०२४ मध्ये त्यांच्याकडे कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघाची पूर्णतः जबाबदारी आणि प्रभारी आहेत. त्या अनुषंगाने ते ता. २७ फेब्रुवारी रोजी चंदगड, आजरा, गडहिंग्लज तालुक्याचा दौरा करणार आहे.
त्याच बरोबर ते बूथ प्रमुख आणि शक्ती केंद्र प्रमुख यांच्याशी ही संवाद साधतील. तालुक्यातील जास्तीत जास्त युवा वर्गाने त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी आवर्जून उपस्थित राहावे तसेच पक्षाच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी उपस्थित राहून निवडणुकीच्या पुढील धोरणाविषयी त्यांचे मार्गदर्शन घ्यावे. आजरा भाजपच्या वतीने अवाहन करण्यात आले आहे.
